---Advertisement---

CSKला मोठा धक्का; ऋतुराज गायकवाड आयपीएल 2025 मधून बाहेर, धोनीकडे पुन्हा कर्णधारपद

On: गुरूवार, एप्रिल 10, 2025 6:41 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025च्या हंगामा दरम्यान मोठा धक्का बसला आहे. संघाचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. या दुखापतीमुळे आता एमएस धोनी उर्वरित आयपीएलसाठी संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. अशी माहिती सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

फ्लेमिंग म्हणाले, “ऋतुराज गायकवाडला गुवाहाटीमध्ये दुखापत झाली. त्याला खूप वेदना होत आहेत. एक्स-रे अनिर्णीत आला आणि नंतर एमआरआयमध्ये रेडियल नेकमध्ये फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो पुढील स्पर्धेसाठी अनुपलब्ध राहील. आम्ही त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करतो, पण हे दुर्दैवी आहे.”

गायकवाडला ही दुखापत 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडेच्या एका उसळत्या चेंडूने झाली होती. चेंडू थेट उजव्या हाताला लागला होता.

फ्लेमिंग पुढे म्हणाले, “आमच्याकडे एक ‘अनकॅप्ड’ खेळाडू आहे. एमएस धोनी. उर्वरित हंगामासाठी कर्णधाराची भूमिका पार पाडेल.” शुक्रवारी चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---