---Advertisement---

ट्रेंट बोल्ट प्रमाणेच न्यूझीलंडच्या या गोलंदाजांनी भारताला दिला आहे त्रास

---Advertisement---

हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या या विजयात ट्रेंट बोल्टने 21 धावा देत 5 विकेट् घेत मोलाचा वाटा उचलला आहे.

न्यूझीलंडची मैदाने नेहमीच भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरली आहे. आजचा सामना ज्या मैदानावर झाला ते सेडन पार्क मैदान भारतासाठी कमनशिबीच ठरले आहे. त्यातच न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना आज सळो की पळो करुन सोडले होते.

बोल्टने भारताच्या रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, केदार जाधव आणि हार्दिक पंड्या या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आंद्रे एडम्सचा विक्रम मोडला आहे.

तो भारताविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करणारा न्यूझीलंडचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध एका वनडे सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन शेन बॉन्ड यांनी 2005 मध्ये केले होते. त्यांनी बुलवायो येथे झालेल्या वनेड सामन्यात भारताविरुद्ध 19 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

आजच्या सामन्यातील बोल्ट प्रमाणेच न्यूझीलंडचे असे काही गोलंदाज होते ज्यांनी भारताविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे.

भारता विरुद्ध वन-डे सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारे न्यूझीलंडचे गोलंदाज-

6/19, शेन बॉण्ड, बुलवायो, 2005

5/21, ट्रेंट बोल्ट, हॅमिल्टन, 2019

5/22, आंद्रे एडम्स, क्विन्सटाऊन, 2003

5/23, रिचर्ड कोलिंगे, ख्राईस्टचर्च, 1976

5/26, जेकब ओरम, ऑकलंड, 2002

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुलचे विश्वचषकातील स्थान धोक्यात…?

भारताविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या ट्रेंट बोल्टने केला मोठा पराक्रम, ब्रेट ली, मॅकग्रा यांनाही टाकले मागे

भारतीय संघाला ट्रोल करणे इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूला पडले भलतेच महागात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment