---Advertisement---

सेहवागच्या मते या आहेत २०१९ वर्षातील कसोटीमधील सर्वोत्तम खेळी…

---Advertisement---

2019 हे वर्ष आता संपत आले आहे. या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच चांगल्या घटना (Happenings) घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) या वर्षातील सर्वोत्तम कसोटीतील खेळी निवडल्या आहेत.

सेहवागने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत यावर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळी निवडल्या आहेत. त्याने 2019 मध्ये चांगली खेळी करणारा श्रीलंकेचा फलंदाज कुशल परेराची प्रशंसा केली आहे. परेराने (Kusal Parera) डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (Sri Lanka vs South Africa) कसोटी सामन्यात नाबाद 153 धावा केल्या होत्या.

परेराने या कसोटी सामन्यात शेवटच्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी करुन आपल्या संघाला एका विकेटने विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. तसेच फलंदाजीला आलेला  श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 191 धावांवर सर्वबाद झाला होता.

दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 259 धावा केल्या होत्या. तर, श्रीलंकेला दुसऱ्या डावात विजयासाठी 304 धावांचे लक्ष होते.

सेहवाग म्हणाला की डर्बनची खेळपट्टी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात चांगली खेळपट्टी मानली जाते. तिथे चांगली कामगिरी करण्याला खूप महत्त्व आहे.

सेहवागने बेन स्टोक्सचीही प्रशंसा केली आणि त्याच्या खेळी बद्दल सांगितले. बेन स्टोक्ससाठी (Ben Stokes) वर्ष 2019 खूपच संस्मरणीय होते. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (फायनल) त्याने उत्कृष्ट खेळी केली. तसेच अ‍ॅशेस मालिकेतही त्याने इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (England vs Australis) ऍशेस मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात त्याने हेडिंग्ले येथे नाबाद 135 धावा केल्या. या सामन्यात स्टोक्सने अंतिम फळीतील फलंदाज जॅक लीचच्या मदतीने इंग्लंडला एक गडी राखून विजय मिळवून दिला.

दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाने 246 धावा केल्या होत्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह. इंग्लंडला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य होते. त्यावेळी 286 धावांवर 9 विकेट्स गमावून इंग्लंड बराच अडचणीत सापडला होता. त्यावेळी इंग्लंड विजयापासून 73 धावा दूर होता. 

परंतु, जॅक लीचसह (Jack Leach) स्टोक्सने 76 धावांची नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या भागीदारीत लीचने केवळ 1 धाव आणि 17 चेंडूंचा सामना केला.

याबरोबरच यार्वषातील सर्वोत्तम कसोटी खेळीमध्ये सेहवागने डेव्हिड वॉर्नरने (David Warner) पाकिस्तानविरुद्ध एडलेड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केलेल्या तूफानी खेळीलाही स्थान दिले आहे. त्यात त्याने 418 चेंडूत नाबाद 335 धावांची खेळी केली होती.

पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या त्रिशतकाच्या जोरावर 3 बाद 589 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आल्यानंतर त्यांनी पहिल्या डावात 302 धावा केल्या तर, दुसऱ्या डावात 239 धावा केल्या. त्यामुळे या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 1 डाव आणि 48 धावांनी विजय मिळवला होता. 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---