---Advertisement---

‘मला श्रीसंत नाही, ब्रेट ली बनायचंय’, भारतीय खेळाडूची ७ वर्षांपूर्वीची कमेंट व्हायरल

On: बुधवार, मार्च 3, 2021 8:15 PM
---Advertisement---

भारतीय संघात सध्या अनेक युवा खेळाडूंनी प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी चांगल्या कामगिरीने सर्वांची वाहवाही मिळवली आहे. यातीलच एक नाव म्हणजे वेगवान गोलंदाज नवदीप सैनी. त्याने दोन वर्षापूर्वी भारतीय संघात पदार्पण केले होते. सध्या तो दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे, पण असे असले तरी तो सध्या त्याच्या ७ वर्षांपूर्वीच्या एका कमेंटमुळे चर्चेत आला आहे.

नक्की काय आहे कमेंट? 

झाले असे की ४ जून २०१३ रोजी सैनीने त्याचा एक ट्रॉफी घेतलेला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. त्यातील एका युजरने कमेंट केली होती की ‘ज्यूनियर श्रीसंत’. त्यावर उत्तर देताना सैनीने लिहिले होते की ‘भाई, मला श्रीसंत नाही बनायचे, मला ब्रेट ली बनायचे आहे.’

सैनीची ही कमेंट सध्या काही चाहत्यांनी पाहिली. त्यामुळे त्याची ही कमेंट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Screengrab: Facebook/Navdeep Saini

साल २०१३ मध्ये श्रीसंतवर आली होती बंदी

खरंतर ७ वर्षांपूर्वी इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळत असताना एस श्रीसंत, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण या तीन खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी ते राहुल द्रविड नेतृत्व करत असलेल्या राजस्थान रॉयल्सकडून खेळत होते. त्यावेळी त्यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आजीवन बंदी घातली होती.

मात्र, दोन वर्षापूर्वी श्रीसंतच्या बंदीचा कालावधी सर्वोच्च न्यायालयाने कमी करण्यास सांगितला. त्यामुळे त्याची बंदी ७ वर्षे करण्यात आली. हा ७ वर्षांच्या बंदीचा कालावधी पूर्ण झाला असून आता श्रीसंतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

सैनीची कारकिर्द

सैनीने २०१९ साली ३ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचवर्षी त्याने डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच कटक येथे वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण केले. आता यावर्षी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे.

त्याने आत्तापर्यंत २ कसोटी, ७ वनडे आणि १० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४ विकेट्, वनडेत ६ आणि टी२०मध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेट ली आहे आदर्श

सैनीने वेगवान गोलंदाजी करताना नेहमी ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सन आणि ब्रेट ली यांना आदर्श मानले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बुमराह बांधणार बाशिंग! पण वधूराणी कोण आहे? ‘या’ अभिनेत्रीसोबत सप्तपदी घेणार असल्याची चर्चा; पाहा फोटो

विराटचे खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर, “आम्ही जेव्हा न्यूझीलंडमध्ये…”

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळल्याचा वॉर्नरला होतोय पश्चाताप, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---