---Advertisement---

WTC फायनल गाजण्यासाठी ‘भारत आर्मी’ तयार, आयसीसीने स्वतः पोस्ट केला व्हिडिओ

---Advertisement---

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमने-सामने येतील. एजबॅस्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर हा ऐतीहासिक सामना खेळवला जाईल. विशेष म्हणजे कोरोना काळातदेखील चाहत्यांना मैदानात सामना पाहण्यासाठी जाण्याची संधी मिळेल. आता याच संधीचा फायदा उठवण्यासाठी व भारतीय संघाला जोरदार समर्थन देण्यासाठी भारत आर्मी देखील सज्ज झाली आहे. स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याबाबतचा व्हिडिओ पोस्ट करत भारत आर्मीची तयारी दाखवली.

आयसीसीने शेअर केला व्हिडिओ
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून भारत आर्मी या भारतीय चाहत्यांच्या समूहाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारत आर्मीचे सर्व सदस्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. कोरोनाचे सावट असल्याने मैदानात केवळ ४००० चाहत्यांना प्रवेश दिला जाईल. त्यामुळे, या अंतिम सामन्यात जास्तीत जास्त प्रेक्षक भारतीय असतील असा अंदाज लावण्यात येत आहे. इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या तसेच नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांची संख्या अधिक असलेली पाहायला मिळते. (Bharat Army Ready for WTC Final)

काय आहे भारत आर्मी
जगभरात भारतीय क्रिकेट संघ कोठेही खेळत असला तरी शेकडो चाहत्यांचा एक समूह भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी मैदानात हजर असतो. त्या समूहाला भारत आर्मी असे नाव देण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले भारतीय राकेश पटेल यांनी १९९९ क्रिकेट विश्वचषकावेळी याची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजतागायत भारत आम्ही जगभरातील विविध मैदानांवर भारतीय संघासाठी उद्घोषणा देताना दिसून येते. भारत आर्मीमधील सदस्य विविध गाणी तसेच ढोल वगैरे वाजून भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा धोनीची मुलगी सीएसकेला नाही तर मुंबई इंडियन्सला करते चिअर, रोहित शर्माने शेअर केला व्हिडिओ

गावसकरांचा सल्ला, ‘त्या’ दोन खेळाडूंना WTC फायनलमध्ये टीम इंडियाकडून जरूर खेळवा

भारतीय संघाच्या मदतीला आला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिले महत्वाचे सल्ले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---