---Advertisement---

मेगा ऑक्शनपूर्वी उघड झाली केकेआरची रणनिती! प्रशिक्षक म्हणतायेत,”कोरोनानंतर…”

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 7:59 AM
kkr
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मागील आयपीएल हंगामात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या संघाला अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. कोलकात्याच्या यशाचे मोठे कारण संघाची फिरकी गोलंदाजी होती. तरीही, चेन्नईला रोखण्यात संघ अपयशी ठरला. परिणामी, संघाला तिसऱ्या आयपीएल विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. आता संघ व्यवस्थापनाने भारतीय संघासह गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या भरत अरुण यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. यासह, अरुण यांनी आपल्या संघाच्या रणनीतीबद्दल देखील सांगितले.

काय म्हणाले अरूण
भारतीय संघाची गोलंदाजी मजबूत केल्यानंतर भरत अरुण कोलकाता नाईट रायडर्ससाठी तीच जबाबदारी निभावताना दिसणार आहेत. त्यांना कितपत यश मिळेल, हेही लिलावात निवडलेल्या खेळाडूंवर अवलंबून आहे. अरुण यांनी संघाच्या अधिकृत संकेतस्थळाशी बोलताना सांगितले, “तुम्हाला अशा खेळाडूंची निवड करणे आवश्यक आहे जे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जुळवून घेऊ शकतात. कोविडच्या आधी संघ घरच्या मैदानाच्या परिस्थितीनुसार गोलंदाजांची निवड करायचे., तेव्हा त्यांना आयपीएलमध्ये सात सामने आपल्या मैदानावर तर, विरोधी संघाच्या मैदानावर सात सामने खेळावे लागत असे.”

अरुण यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासोबत बराच काळ घालवला आहे. त्यांना विश्वास आहे की, ते केकेआरसाठी या अनुभवाचा उपयोग करू शकतात. भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज राहिलेले अरुण पुढे म्हणाले, “जगातील मोठ्या खेळाडूंचे बारकाईने निरीक्षण केले असल्याने ते काय करू शकतात, याबद्दल मला बरीच माहिती आहे. ही गोष्ट चांगले निर्णय घेण्यास मदत करते. तसेच, तुम्ही सामन्यादरम्यान अधिक प्रभावीपणे नियोजन करू शकता.”

दोन वेळा विजेता राहिला आहे कोलकत्ता संघ
कोलकाताने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या हंगामात प्रथमच कोलकाताला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता नव्या हंगामासाठी संघाला सुरुवातीपासूनच मजबूत संघ उभारण्याची आशा असेल. केकेआरने मागील संघातील आंद्रे रसेल (१२ कोटी), सुनील नरीन (६ कोटी), व्यंकटेश अय्यर (८ कोटी) आणि वरुण चक्रवर्ती (८ कोटी) या चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. मेगा लिलावात २१ खेळाडूंच्या खरेदीसाठी अभिनेते शाहरुख खान यांच्या संघाकडे ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धवन-ऋतुराज कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ‘या’ खेळाडूची लागली लॉटरी; वनडे संघात झाला समावेश (mahasports.in)

U19 वर्ल्डकप: ‘यंग इंडिया’चा ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय; सलग चौथ्यांदा केला अंतिम फेरीत प्रवेश (mahasports.in)

भारत दौऱ्यानंतर श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, नावे आहेत २८५ विकेट्स (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---