गोल्ड कोस्ट | वेटलिफ्टर मिराबाई चानूच्या कालच्या सुवर्ण पदकापाठोपाठ आज दुसऱ्या दिवशीही भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. भारताच्या संजिता चानूने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विरेंद्र सेहवागनेही आपल्या खास शैलीत संजिता चानूचे अभिनंदन केले आहे.
‘भारतीय नारी सब पर भारी’ एक आणखी सुवर्ण पदक, भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दलअभिनंदन संजिता चानू. आम्हांला तुझा अभिमान वाटतो”, असे सेहवागने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Bhartiya Naari Sab par Bhaari. One more Gold. Congratulations #SanjitaChanu for winning our second gold in #GC2018Weightlifting in the women's 53kg category. #CWG2018
Her second CWG gold after the 48kg one in Glasgow. Proud of you champion. pic.twitter.com/Xnms7T6Byz— Virender Sehwag (@virendersehwag) April 6, 2018
५३ किलो वजनी गटात संजिता चानूने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या वजनी गटात तिने १९२ किलो वजन उचलत ही कामगिरी केली. २०१४ साली ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकले होते.
स्नच प्रकारात तिने पहिल्या प्रयत्नात ८१, दुसऱ्या प्रयत्नात ८३ तर तिसऱ्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विश्वविक्रम केला आहे.
क्लिन आणि जर्क प्रकारात तिने पहिल्या प्रयत्नात १०४, दुसऱ्या प्रयत्नात १०८ तर तिसऱ्या प्रयत्नात ११२ किलो वजन उचलले.
यामुळे तिने एकूण १९२ किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. पीएनजीची लोआ डिका १८२ किलो वजन उचलच रौप्य पदकाची विजेती ठरली आहे.
यामुळे तिन पदकासह भारत पदकतालिकेत तिसऱ्या स्थानी आला आहे.