पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने वसंत रांजणे इलेव्हन संघाचा 4 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात अतितटीच्या झालेल्या लढतीत शंतनू सुगवेकरच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने वसंत रांजणे इलेव्हन संघाचा केवळ 4 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
पहिल्यांदा खेळताना शंतनू सुगवेकरच्या नाबाद 21, रणजीत खिरीदच्या 23 व आशिष देसाईच्या 17 धावांच्या बळावर भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 15 षटकात 4 बाद 91 धावा केल्या. 91 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शंतनू सुगवेकर, उमेश गोटखिंडीकर व भुषण देशपांडे यांच्या अचूक गोलंदाजीने वसंत रांजणे इलेव्हन संघाचा डाव 15 षटकात 4 बाद 87 धावांत रोखला. यात संजय दरवटकरच्या दमदार 61 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. नाबाद 21 धावा व 17 धावांत 2 गडी बाद करणारा शंतनू सुगवेकर सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय टेस्ट क्रिकेटपटू सदानंद मोहोळ यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साई9 स्पोर्टस् चे साईराज गायकवाड, स्पर्धा संचालक अनिल वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन- 15 षटकात 4 बाद 91 धावा(शंतनू सुगवेकर नाबाद 21, रणजीत खिरीद 23, आशिष देसाई 17, सुभाष रांजणे 2-13, मोहन जाधव 1-13, विवेक मालशे 1-21) वि.वि वसंत रांजणे इलेव्हन- 15 षटकात 4 बाद 87 धावा(संजय दरवटकर नाबाद 61(48), शंतनू सुगवेकर 2-17, उमेश गोटखिंडीकर 1-7, भुषण देशपांडे 1-27) सामनावीर- शंतनू सुगवेकर
भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 4 धावांनी सामना जिंकला.
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- मंदार दळवी(8 गडी बाद, राजु भालेकर इलेव्हन)
सर्वोत्कृष्ट फलंदाज- आनंद दळवी( 104धावा भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन)
मालिकावीर- पराग चितळे (8 गडी बाद आणि 132 धावा, वसंत रांजणे इलेव्हन