टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेचा थरार संपल्यानंतर सध्या टोकियो पॅरालिंपिक २०२१ स्पर्धा खेळल्या जात आहेत. या स्पर्धेतील रविवारचा दिवस (२९ ऑगस्ट) भारतीयांसाठी अतिशय विशेष ठरला आहे. महिला टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने रविवारी भारतासाठी यंदाच्या टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील पहिलेवहिले पदक जिंकले आहे.
महिला एकेरी फेरी क्लास ४ च्या अंतिम सामन्यात तिचा सामना चीनच्या झोउ यिंगसोबत झाला. मात्र जगातील अव्वल टेबल टेनिसपटू म्हणून ओळखली जाणारी यिंगने भाविनाला पराभूत केले. असे असले तरीही, भाविनाने रौप्य पदक पटकावले आहे.
महिला एकेरी फेरी क्लास ४ च्या पहिल्या राउंडमध्ये यिंगने तिच्या बॅकहँड शॉट्सने भाविनाला त्रस्त केले होते. परिणामी तिने पहिल्या राउंडमध्ये भाविनावर ११-७ ने विजय मिळवत १-० ची आघाडी घेतली होती. पुढील राउंडमध्येही तिने आपला दबदबा काय कायम राखला आणि ११-५ ने विजय मिळवला. तिसऱ्या राउंडमध्ये दोघींमध्ये अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. परंतु अखेर यिंगने ११-६ ने बाजी मारली आणि भिवानीला ३-० ने दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
A #Silver medal #IND will remember ❤️
Bhavina Patel's incredible #Paralympics campaign ends with a podium finish as she loses out to #CHN's Zhou Ying 11-7, 11-5, 11-6 in her Class 4 #ParaTableTennis final! 🏆
Thank you for the moments 😃 pic.twitter.com/j8GcnHDtDL
— Olympic Khel (@OlympicKhel) August 29, 2021
यापूर्वी भाविनाने चीनच्या मियाओ झांगला ७-११, ११-७, ११-४, ९-११ आणि ११-८ ने पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यामुळे तिचे पदक निश्चित झाले होते. तिच्या या यशासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे तोंडभरुन कौतुक केले होते.