पुणे। ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित सातव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात आदर्श भोजवानी, आरव गौर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत शनिवारचा दिवस गाजवला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या मुलांच्या गटात बिगरमानांकीत आदर्श भोजवानीने सहाव्या मानांकित प्रसाद क्षितिजचा टायब्रेकमध्ये 5-4(6) असा संघर्षपूर्ण पराभव केला. आरव गौर याने चौथ्या मानांकित साईराज गावडेचा 5-0 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित स्मित उंडरेने देवीत गोसावीला 5-1 असे सहज पराभूत केले. दुसऱ्या मानांकित अहान जैनने अर्जित बावसकरचा 5-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेत एकूण 181 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे उदघाटन तुषार दोशी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस एटीए,, प्राईम स्पोर्ट्सचे नरेन शहा, जीआरडी इन्फ्राप्रोजेक्ट्सचे गौरव अत्तरदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश राजेशिर्के, राजलक्ष्मी सारीज, ओम दळवी मेमोरिअल ट्रस्टचे उमेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
10 वर्षाखालील मुली: पहिली फेरी:
सान्या काब्रा वि.वि.सान्वी गोसावी 5-1;
सारा फेंगसे वि.वि.श्रीया रांजळकर 5-0;
झेन गुप्ता वि.वि.आन्या लेकासरा 5-2;
आयुषी तरंगे वि.वि. आयाती तुडेकर 5-4(7);
10 वर्षाखालील मुले: पहिली फेरी:
स्मित उंडरे(1) वि.वि.देवीत गोसावी 5-1;
अहान जैन(2) वि.वि.अर्जित बावसकर 5-3;
आदर्श भोजवानी वि.वि.प्रसाद क्षितिज(6) 5-4(6);
आरव गौर वि.वि.साईराज गावडे(4) 5-0;
अथर्व बगाडे(5) वि.वि.ओम चौधरी 5-1;
आरव मुळ्ये(3) वि.वि.बलराज बिरादर 5-0.