भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जबरदस्त प्रदर्शन केले. भुवनेश्वरने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे पाकिस्तान संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही. शेवटच्या षटकांमध्ये त्याचे प्रदर्शन खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र होते. या जबरदस्त प्रदर्शानाच्या जोरावर भुवनेश्वर भारतासाठी कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्र पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक टी-20 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
रविवारी भारतीय संघाने पाकिस्तान संघाविरुद्धच्या या सामन्याने आशिया चषक 2022 हंगामात स्वतःचे अभियान सुरू केले. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून दाखवली. भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) याने सामन्यात टाकलेल्या 4 षटकांमध्ये 26 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स देखील घेतल्या. आता तो पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध पाच टी-20 सामन्यांमध्ये एकूण 8 विकेट्स घेतल्या आहेत.
यादीत दुसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आहे, ज्याने पाकिस्तानविरुद्ध 3 डावांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. माजी दिग्गज इरफान पठाण या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ३ डावांमध्ये पाकिस्तानच्या 6 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आहे. अशोक डिंडाने 2 डावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रविंद्र जडेजा यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने 6 डावांमध्ये 4 विकेट्सची मिळवल्या आहेत. त्यानंतर यादीत भारताचे माजी दिग्गज आरपी सिंग आणि युवराज सिंग यांची नाव येतात.
पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे फलंदाज
८ – भुवनेश्वर कुमार (5 डाव)
7 – हार्दिक पंड्या (3 डाव)
6 – इरफान पठाण (3 डाव)
4 – अशोक डिंडा (2 डाव)
4 – रवींद्र जडेजा (6 डाव)
4 – आरपी सिंग (2 डाव)
4 – युवराज सिंग (5 डाव)
दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यात केलेल्या जबरदस्त गोलंदाजपुढे पाकिस्तान संघ संपूर्ण 20 षटकेही टिकू शकला नाही. पाकिस्तानने 19.5 षटकात 147 धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. भुवनेश्वरव्यतिरिक्त या सामन्यात भारतासाठी हार्दिक पंड्या (3), अर्शदीप सिंग (2) आणि अवेश खान (1) यांनीही महत्वाचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 त टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी घडवला इतिहास; पहिल्यांदाच घडलय ‘असं’ काही
हाय वोल्टेज सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज फुस्स! भारतापुढे विजयासाठी 148 धावांचे आव्हान
टेन्शनच्या वातावरणातही झमानने जिंकली साऱ्यांचीच मने; ‘ती’ कृती ठरते चर्चेचा विषय