इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाची सुरुवात शानदार झाली आहे. या लीगमध्ये यावर्षी १० संघ खेळत आहेत. भारताचा ३२ वर्षीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आयपीएलमध्ये ४ विकेट्स घेतल्या, तर तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये युझवेंद्र चहल, सुनील नारायण आणि रविचंद्रन अश्विन या गोलंदजांना मागे टाकू शकतो. आता सनरायझर्स हैदराबाद संघ ९ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आपला तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या, तर तो या खेळाडूंचा विक्रम मोडेल.
युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ११६ सामने खेळले असून ११५ डावात २१.८च्या सरासरीने १४४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सुनील नारायणने (Sunil Narine) १३७ सामन्यांतील १३६ डावात २४.५च्या सरासरीने १४५ विकेट्स घेतल्या आहेत, तर रविचंद्रन अश्विनने १६९ सामन्यांत १६६ डावात २७.९ च्या सरासरीने १४६ विकेट्स घेतल्या आहेत.
भुवनेश्वरने आयपीएलमध्ये १३४ सामन्यांत १३४ डावात २५.४७च्या सरासरीने १४३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये एकवेळा ५ विकेट्स आणि दोन वेळा ४-४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी म्हणजे १९ धावा देत ५ विकेट्स आहेत. भुवनेश्वरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २१ सामन्यांत २६.१च्या सरासरीने ६३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने टी२०मध्ये ५९ सामन्यांत ५८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत १२१ सामन्यांत १४१ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोच्या (Dwayne Bravo) नावावर आहे. ब्रावोने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १५४ सामन्यांत १५१ डावांत २४.१च्या सरासरीने १७२ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये दोन वेळा ४ विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
भुवनेश्वर आयपीएलच्या १५व्या हंगामात हैदराबाद संघाकडून खेळत आहे. संघाने आत्तापर्यंत दोन सामने खेळले असून दोनही सामन्यात संघाला अपयश आले आहे. पहिल्या सामन्यात राजस्थानने संघाला ६१ धावांनी पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात सोमवारी (४ एप्रिल) लखनऊ संघाने १२ धावांनी पराभूत केले. आता संघ आपला तिसरा सामना सीएसकेविरुद्ध ९ एप्रिलला खेळणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दीपक हुड्डा अन् केएल राहुलची मोठी झेप; टॉप-५मध्ये मिळवले ‘हे’ स्थान
IPL2022| बेंगलोर वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, ‘हे’ खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!