---Advertisement---

RCB vs CSK सामन्यात भुवनेश्वर कुमारकडे मोठी सुवर्णसंधी; फक्त एक विकेट घेताच रचणार नवा इतिहास!

On: शनिवार, एप्रिल 4, 2026 10:29 PM
---Advertisement---

आयपीएल (IPL) 2026 मध्ये 5 एप्रिल हा ‘सुपर संडे’चा दिवस असेल. या दिवशी दोन सामने खेळवले जातील. दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे संघ आमने-सामने असतील. हा हाय-व्होल्टेज सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात आरसीबीचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे (Bhuvneshwar Kumar) एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

भुवनेश्वरने आतापर्यंत 191 डावांत 199 विकेट्स घेतल्या आहेत. जर त्याने या सामन्यात फक्त 1 विकेट घेतली, तर तो आयपीएल इतिहासात 200 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरेल. आतापर्यंत केवळ फिरकीपटू युझवेंद्र चहलने (224 विकेट्स) हा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाला 200 विकेट्स घेता आलेल्या नाहीत.

भुवनेश्वरने 2011 मध्ये ‘पुणे वॉरियर्स इंडिया’कडून आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2014 ते 2024 पर्यंत तो ‘सनरायझर्स हैदराबाद’चा मुख्य गोलंदाज होता. गेल्या दोन वर्षांपासून तो आरसीबी संघाचा भाग आहे. या हंगामात तो बंगळुरूसाठी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आरसीबीने या हंगामाची सुरुवात विजयाने केली असून त्यांनी पहिल्या सामन्यात हैदराबादला 6 विकेट्सनी हरवले आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ससाठी हंगामाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने (राजस्थान आणि पंजाबविरुद्ध) गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईचा संघ या सामन्यात विजय मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---