---Advertisement---

भुवीचा पॅटर्नच वेगळा! एकच विकेट घेऊनही झहीर अन् संदीपनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच गोलंदाज

---Advertisement---

आयपीएल २०२१ चा ४० वा सामना सोमवारी (२७ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना हैदराबादने ७ विकेट्सने जिंकला. या सामन्यात हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक विशेष कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये पहिल्या सहा षटकांत अर्थात पावरप्लेमध्ये ५० पेक्षा अधिक बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे.

भुवनेश्वरने राजस्थानच्या एविन लुईसची विकेट घेताच ही खास कामगिरी केली आहे. त्याने लुईसला अब्दुल समदकडून झेलबाद केले. माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि त्याचा संघसहकारी संदीप शर्मा यांच्यानंतर पावरप्लेमध्ये ५० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा भुवनेश्वर हा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

झहीर बेंगलोर, मुंबई आणि दिल्ली या तीन फ्रँचायझींसाठी खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळताना पावरप्लेमध्ये एकूण ५० विकेट्स घेतल्या आहेत. झहीरने आयपीएलमध्ये १०० सामन्यांमध्ये १०२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर संदीपच्या नावावर आयपीएलमध्ये खेळताना पावरप्लेमध्ये ५३ विकेट्स आहेत. संदीपने आयपीएलमध्ये एकूण ९९ सामने खेळले आहेत आणि ११३ विकेट्स घेतल्या आहेत.

भुवनेश्वरने आतापर्यंत आयपीएलमध्ये १३० सामने खेळले असून १४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने भारतासाठी २१ कसोटी, ११९ एकदिवसीय आणि ५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याच्या कसोटीत ६३ विकेट्स, वनडेमध्ये १४१ विकेट्स आणि टी-२० मध्ये ५० विकेट्स आहेत. भुवनेश्वरची यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

राजस्थानने आतापर्यंत १० पैकी ४ सामने जिंकले असून अद्याप त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद संघासाठी यंदाची आयपीएल अत्यंत खराब राहिली आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात १० पैकी ८ सामने गमावले आहेत. हा सामना जिंकला असला, तरी प्लेऑफसाठी पात्र ठरणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-
-‘हैदराबाद सोडून चेन्नई संघात जा…’, डेव्हिड वॉर्नरला प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळाल्याने संतप्त चाहत्यांच्या प्रतिक्रिया
-हैदराबादविरुद्ध संजूची ८२ धावांची ‘कर्णधार खेळी’; ३ हजारी मनसबदार बनत धोनी, कोहलीच्या क्लबमध्ये सामील
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---