मँचेस्टर। काल, 3जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेटने विजय मिळवत इंग्लंड दौऱ्याची शानदार सुरुवात केली.
मात्र या सामन्यात नेहमी शांत असणाऱ्या भुवनेश्वर कुमारला अचानक चिडताना पाहिल्यावर क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
झाले असे की इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता.
भुवनेश्वर या षटकाच्या शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत असताना इंग्लंडचा डेविड विली फटका मारण्यासाठी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर उभा राहिला होता. त्यामुळे विलीला असे पाहुन भुवनेश्वर तो चेंडू टाकला नाही.
त्यानंतर अचानक भुवनेश्वरने चिडून विलीशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावर विलीने त्याला परत रनअप घेण्यासाठी जा असा इशारा केला.
त्याआधी याच षटकात भुवनेश्वर कुमारने 2 चेंडू वाईड टाकले होते. तसेच 17 व्या षटकात भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर विलीने 1 षटकार आणि 2 चौकार मारले होते. तसेच भुवनेश्वरला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही.
https://twitter.com/VinayTr85616518/status/1014210836540284928
पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विजय:
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 159 धावा केल्या होत्या. भारताने 18.2 षटकातच या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला. त्यामुळे भारताने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना 6 जुलैला कार्डीफ येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळे नुसार रात्री 10 वाजता सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर अडकली मोठ्या वादात
-जगाला मिळणार दुसरा शेन वार्न, वय आहे फक्त ७ वर्षे
-कुलदीप यादवला कमी लेखणे महागात पडले, या खेळाडूने मान्य केली चूक