भारतीय क्रिकेट संघाच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) काही दिवसांपूर्वीच वडील बनला आहे. भुवनेश्वरची पत्नी नूपुर नागर (Nupur Nagar)ने दिल्लीतील एका रुग्णालयात २४ नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. यानंतर आता २७ दिवसांनी अर्थातच सोमवारी (२० डिसेंबर) त्याने आपल्या मुलीचा पहिला फोटो (First Photo) चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
भुवनेश्वरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भुवनेश्वर आणि त्याची पत्नी आपल्या लहानग्या मुलीकडे बघताना दिसत आहेत. भुवनेश्वरने त्याच्या मुलीला आपल्या हातात घेतले आहे. या फोटोमध्ये भुवनेश्वर आणि नूपुरने लाल रंगांचे पारंपारिक कपडे परिधान केले आहेत.
आपल्या नवजात मुलीचे पहिल्यांदाच घरी आगमन झाल्याने एक पूजा ठेवण्यात आली होती. या पुजेच्या निमित्तानेच त्यांनी पारंपारिक कपडे घातले होते. असे असले तरीही, अद्याप त्याने आपल्या मुलीचे नाव चाहत्यांना सांगितलेले नाही. त्यामुळे चाहते त्याला यावरुन प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CXqw7aivMNn/?utm_source=ig_web_button_share_sheet
२०२० मध्ये वडील बनणारा भुवनेश्वर तिसरा भारतीय खेळाडू
भारतीय क्रिकेट संघातील यावर्षी वडील बनणाऱ्यांमध्ये भुवनेश्वर तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव हे दोन्ही भारतीय खेळाडू याचवर्षी वडील बनले आहेत. विशेष म्हणजे, भुवनेश्वर आणि नूपुर यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना मुलगी झाली होती. त्यावेळी तो रांची येथे न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामना खेळत होता. परंतु मुलीच्या जन्माचे वृत्त कळताच तो दिल्लीला रवाना झाला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्याच्या टी२० मालिकेत त्याने चांगले प्रदर्शन केले होते. मागच्या बऱ्याच दिवसांपासून तो खराब फार्मशी झगडत होता. मात्र, त्याने या मालिकेत चांगल्या प्रकारे पुनरागमन केले आहे. त्याने या मालिकेतील तिन्ही सामने खेळले आणि तीन विकेट्स घेत संघासाठी किफायतशीर गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते.
याचवर्षी भुवनेश्वरने गमावला सर्वात मोठा आधारस्तंभ
तत्पूर्वी, याच वर्षी त्याला पितृशोक झाला होता. त्याचे वडील किरण पाल सिंग यांचे यावर्षी २० मे रोजी दुःखद निधन झाले होते. त्याच्या वडिलांना मागच्या बऱ्याच काळापासून यकृतासंबंधी आजार होता आणि याच कारणास्तव त्यांचे निधन झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा चाहत्यांच्या कानात घुमणार रवी शास्त्रींचा आवाज; यादिवशी होऊ शकतो श्रीगणेशा
भारताविरुद्धच्या पहिला कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेटच मोठा निर्णय, मानाची स्पर्धा स्थगित