यंदाच्या आयपीएल हंगामातील 46वा सामना रविवारी (27 एप्रिल) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) संघात खेळला गेला. आरसीबीने मागील पराभवाचा बदला घेत शानदार विजय मिळवला. यावेळी आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही (Bhuvneshwar Kumar) विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने अतिशय दमदार गोलंदाजी केली. यासोबतच भुवनेश्वर कुमारने आपल्या नावावर एक मोठा रेकाॅर्ड केला आहे. तो आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 33 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने विशेषतः शेवटच्या षटकात खूप प्रभावी गोलंदाजी केली. त्याच वेळी, भुवनेश्वरने आपल्या नावावर एक मोठा रेकाॅर्ड केला. आता तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे.
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत एकूण 185 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 193 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 19 धावांत 5 विकेट्स अशी आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) नावावर आहे. चहलने आतापर्यंत 169 सामन्यांमध्ये 214 विकेट्स घेतल्या आहेत. आता भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. जो दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहे. या क्षमतेमुळे तो 2011 पासून या मेगा लीगचा भाग आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत. या हंगामात तो आरसीबीचा भाग बनला आहे आणि तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
आयपीएल 2025चा 46वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 6 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला निर्धारित 20 षटकांत 8 विकेट्स गमावून फक्त 162 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 18.3. षटकांत केवळ 4 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स-
युझवेंद्र चहल – 214
भुवनेश्वर कुमार – 193*
पियुष चावला – 192
सुनील नारायण – 187
रवी अश्विन – 185
ड्वेन ब्राव्हो – 183






