गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी येथे टी20 विश्वचषकात भारत विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात सर्वच खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय संघाने स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय साकारला. भारताने हा सामना 56 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने खास कामगिरी करत आपल्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 मधील मोठ्या विक्रमाची नोंद केली.
सिडनी येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने निर्धारित 20 षटकात 2 बळी गमावत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 179 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना नेदरलँड्स संघाला अपयश आले. त्यांना यावेळी 20 षटकात 9 गडी गमावत 123 धावाच करता आल्या. सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय गोलंदाजी विभागाचा प्रमुख भुवनेश्वर कुमार यांनी या सामन्यातही आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या तीन षटकात केवळ 9 धावा देत दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भुवनेश्वरने त्याची पहिली आणि दुसरी अशी सलग दोन षटके निर्धाव (मेडन) टाकली.
यासोबतच भुवनेश्वर यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पावर प्लेमध्ये 1000 चेंडू टाकणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याच्याआधी अशी कामगिरी केवळ न्यूझीलंडच्या टीम साऊदीने केली आहे. भारतातर्फे या यादीमध्ये दुसरा क्रमांक हा विश्वचषक खेळत नसलेल्या जसप्रीत बुमराह याचा लागतो. त्याने आतापर्यंतच्या आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 500 पेक्षा जास्त चेंडू पावर प्लेमध्ये टाकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील सर्वात भारी व्हिडिओ, अर्धशतकवीर सूर्याला सेलिब्रेशन करण्यास विराटने पाडले भाग
VIDEO: सरकारही पडलं अन् ‘तोही’ झाला शांत, बांगलादेशच्या सलामीवीरांनी गपगुमान धरली तंबूची वाट