भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. आयपीएलमध्ये तो चांगली कामगिरी करतोय. मात्र टीम इंडियात त्याचं पुनरागमन झालेलं नाही.
भुवनेश्वर कुमारनं नुकतेच यूपी टी20 लीगमध्ये आपल्या गोलंदाजीनं कहर केला. त्यानं युपी फाल्कन्ससाठी चार षटकात फक्त 4 धावा दिल्या. यादरम्यान त्यानं एक ओव्हर मेडनही टाकला. त्याला एकही विकेट मिळाली नसली, तरी काशी रुद्रचे फलंदाज त्याच्याविरुद्ध धावा करण्यास चाचपडत होते. भुवनेश्वरनं आपल्या स्पेलमध्ये 24 बॉल पैकी तब्बल 20 डॉट बॉल्स टाकले.
भुवीबद्दल बोललं जात की, गोलंदाजीत त्याचा वेग कमी झाला असला, तरी त्याच्यात स्विंग करण्याची क्षमता अजूनही पूर्वीप्रमाणेच आहे. तो टीम इंडियासाठी टी20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यासाठी कसून तयारी करतोय. भुवनेश्वर कुमारनं भारतासाठी 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता.
भुवनेश्वर कुमार एकेकाळी भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्यानं टीम इंडियासाठी आतापर्यंत 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आपल्या स्विंग बॉलिंगनं फलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या भुवनेश्वरनं कसोटी फॉरमॅटमध्ये 63 विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीसोबतच भुवनेश्वरनं फलंदाजीतही आपलं कौशल्य दाखवलं. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 3 अर्धशतकांसह 552 धावा केल्या आहेत.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भुवनेश्वर भारताचा महत्त्वाचा गोलंदाज होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 141 विकेट घेतल्या आहेत. तर टी20 मध्ये त्याच्या नावावर 90 विकेट आहेत. आयपीएल 2024 मध्ये भुवीनं सनरायझर्स हैदराबादसाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तेव्हा त्याचं भारतीय संघात पुनरागमन होईल, असं बोललं जात होतं. मात्र त्याला अद्याप पुन्हा संधी मिळालेली नाही.
हेही वाचा –
इंग्लंडच्या कर्णधाराचं अनोखं शतक, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असं प्रथमच घडलं!
वयाच्या 17व्या वर्षी सैन्यात भरती झाला, सीमेवर पाय गमावला; अन् आता भारतासाठी पदक जिंकलं!
ऑलिम्पिकमध्ये दुष्काळ….तर पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा वर्षाव! भारताच्या ऐतिहासिक कामगिरीमागचं कारण काय?