टी-२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबर (बुधवार) रोजी टी-२० मालिकेची सुरुवात झाली. दोन्ही संघ टी-२० विश्वचषकात त्यांना मिळालेल्या अपयशाला विसरून पुन्हा विजयी पथावर परतण्याचा प्रयत्नात आहेत. भारतीय संघासाठी हा पहिला सामना खास ठरला. या सामन्यात भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक आणि नवीन टी-२० कर्णधार मिळाले. अशात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमरानेही या सामन्यात एक खास आठवण तयार केली.
सामन्यात भारताने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी गोलंदाजीवेळी पहिले षटक टाकण्यासाठी भूवनेश्वर कुमार आला. त्याने त्याच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने एक धाव घेतली आणि स्ट्राइकवर डार्ली मिशेल आला.
यानंतर भुवनेश्वरने षटकाचा तिसरा चेंडू टाकला आणि मिशेल सामन्यातील पहिल्याच चेंडूचा सामना करताना विकेट गमावून बसला. आणि तीही अशी तशी नाही तर, भूवीच्या जबरदस्त स्विंगवर तो त्रिफळाचीत झाला. याचबरोबर भवनेश्वरने पहिल्या षटकात मिशेलची विकेट घेताच, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या.
Bhuvneshwar Kumar giving 2016-2017 vibes🥰#INDvNZ
pic.twitter.com/885kfsQnEg— Un-Lucky (@Luckyytweets) November 17, 2021
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत भुवनेश्वर सध्या चौथ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे आला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सध्या रविचंद्रन अश्विन आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५८ विकेट्स घेतल्या आहेत.
तर, भारताकडून सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ६६ विकेट्स घेत जसप्रीत बुमराह विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर ६३ विकेट्स घेऊन युजवेंद्र चहल आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर ४६ विकेट्ससह रवींद्र जडेजा आहे.
CASTLED 💥
Bhuvneshwar Kumar makes a mess of the stumps as Daryl Mitchell walks back for a first-ball 🦆#INDvNZ pic.twitter.com/QH6WqIiKpw
— ICC (@ICC) November 17, 2021
दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर मिशेल शुन्यावर बाद झाल्यानंतर मार्टिन गप्टील आणि चैंपमेन यांनी चांगली फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताला १६५ धावसंख्येचा आव्हान दिले.