भारत व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान दुबई येथे आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात वर्चस्व राखत 101 धावांनी मोठा विजय संपादन केला. विराट कोहलीचे बहुप्रतिक्षित शतक सामन्याचे वैशिष्ट्य राहिले. मात्र, भारताचाच अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पाच बळी मिळवत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
सुपर फोरच्या पहिल्या दोन सामन्यात अत्यंत महागडी गोलंदाजी केल्याने भुवनेश्वरवर जोरदार टीका होत होती. त्याने या टीकेला प्रत्युत्तर देत आपली कामगिरी उंचावली. सध्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज असलेल्या भुवनेश्वरने आपल्या चार षटकात केवळ 4 धावा देत एक निर्धाव षटक टाकत 5 बळी टिपले. आपल्या पहिल्या षटकात दोन आणि दुसऱ्या षटकात दोन बळी घेताना अफगाणिस्तानला सामन्यातून बाहेर गेले.
भुवनेश्वर कुमारने 4 षटकात फक्त 4 धावा दिल्या. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा हा सर्वात किफायतशीर स्पेल आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांच्या कोणत्याही गोलंदाजाने आपल्या 4 षटकांचा स्पेल पूर्ण करताना यापेक्षा कमी धावा दिल्या नाहीत. भुवीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 84 बळी घेतले आहेत. युजवेंद्र चहलला मागे टाकत तो सर्वाधिक टी20 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एकापेक्षा जास्त वेळा पाच बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
आपल्या या शानदार स्पेल दरम्यान भुवनेश्वर भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 बळी मिळवणारा गोलंदाजही ठरला. त्याच्या नावे यावर्षी 31बळी जमा झाले आहेत. यापूर्वी जसप्रीत बुमराह याने 2016 मध्ये 28 बळी टिपलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर प्रतिक्षा संपली! ‘किंग कोहली’चे 2 वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय शतक
घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे






