सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून उर्वरित दोन सामन्यांसाठी दोन्ही संघ अहमदाबादला रवाना झाले आहेत. अहमदाबाद येथील कसोटी सामने संपल्यानंतर उभय संघांमध्ये पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
या मालिकेसाठी भारतीय संघ काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचवेळी टी-२० विश्वचषकापूर्वी सगळे पर्याय आजमावून पाहण्याची ही शेवटची संधी असल्याने काही खेळाडूंचे पुनार्ग्मान होण्याचीही शक्यता आहे. यातच आता दुखापतीतून सावरत असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.
बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता
इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याच्या विचारात आहे. त्याच्यावरील अतिरिक्त ताण लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. एका बीसीसीआय अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, “बुमराहने ऑस्ट्रेलियात जवळपास १५० षटके गोलंदाजी केली. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही जवळपास ३० षटके गोलंदाजी केली. त्यामुळे हे लक्षात घेता अहमदाबादच्या दोन कसोटी सामन्यांनंतर त्याला विश्रांती देणेच योग्य ठरेल.”
तसेच या मालिकेत टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ काही प्रयोग करेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरत असल्याने त्यांचे संघात पुनरागमन होऊ शकते. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन आणि नवदीप सैनी देखील संघात परत येऊ शकतात.
भुवनेश्वर कुमारबाबत बोलायचे झाल्यास मागील वर्षी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर तो संघात एकदाही परत आला नाही. उत्तर प्रदेशच्या संघासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने काही सामने खेळले, मात्र तो फारसा लयीत दिसला नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघात त्याचे पुनरागमन झाल्यास तो कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले स्थान
ब्रेकिंग! इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले स्थान
जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती