आयपीएल 2024 च्या हंगामातला रविवार (26 मे) शेवटचा दिवस आहे. कारण आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) फायनलसाठी आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवरती दोन्ही संघ नवीन इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत.
तत्पूर्वी, हैदराबाद संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं वक्तव्य समोर आलं आहे. भुवनेश्वर म्हणाला, “ही आमच्यासाठी एक वेगळी भावना आहे. आमचा संघ गेल्या 3 वर्षापासून प्ले-ऑफमध्ये पोहचला नाही.” हैदराबाद आज फायनलसाठी कोलकाताला भिडणार आहे. दोन्ही संघ फायनल जिंकण्यासाठी खूप मजबूत आहेत.
केकेआरनं या हंगामात धमाकेदार कामगिरी केली आहे. साखळीफेरी सामन्यात त्यांनी 9 विजय मिळवले. तर 2 सामने अनिर्णित राहिलं. केकेआरनं गुणतालिकेचं शीर्श स्थान सोडलं नाही. 20 गुणांसह त्यांनी थेट क्वालिफायर 1 मध्ये धडक मारली. हैदराबादला क्वालिफायर 1 मध्ये 8 विकेट्सनं नमवून फायनलच्या दिशेने आगेकूच केली. तर हैदराबादनं क्वालिफायर 2 सामन्यात मिळालेल्या संधीचं सोनं करत राजस्थानचा 36 धावांनी धुव्वा उडवला. आज हैदराबाद फायनलमध्ये केकेआरला भिडण्यास सज्ज आहेत.
भुवनेश्वर कुमार म्हणाला, “या हंगामात ज्याप्रकारे आम्ही सुरुवात केली. तेव्हा आम्हाला वाटत होतं की, आम्ही फायनलमध्ये नक्की प्रवेश करु. फायनल खेळणं आमच्यासाठी एक वेगळी भावना आहे. आमचा संघ गेल्या 3 वर्षापासून प्ले-ऑफमध्ये पोहचला नाही. आमच्या संघातील सर्व खेळाडू आनंदी आहेत. कारण फायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येकानं योगदान दिलं आहे. आयपीएलचं विजेतेपद पटकावनं आमच्यासाठी खूप खास आहे. आता आम्ही फायनलमध्ये पोहचलोय म्हंटल्यावर नक्कीच ट्राॅफी जिंकणार.”
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलची जगभरात चर्चा! प्रसिद्ध रॅपरनं लावला शाहरुख खानच्या टीमवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा
आयपीएलच्या फायनलमध्ये ‘हे’ 5 खेळाडू खळबळ माजवू शकतात! ट्रॉफी जिंकण्यासाठी यांना रोखणं गरजेच
2012 ला कोलकातानं याच मैदानावर पटकावलं होतं विजेतेपद! केकेआर पुन्हा रचणार का इतिहास?