भारतीय संघासाठी मोठी बातमी समोर येत आहे. संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा पुढील ६ महिन्यांसाठी संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळे तो आता आयपीएल २०२१ दरम्यानच मैदानात पुनरागमन करताना दिसेल. भुवनेश्वरला २ ऑक्टोबरला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यादरम्यान तो १९ व्या षटकातील केवळ १ चेंडू टाकून मैदानातून बाहेर पडला होता.
भुवनेश्वर सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या दुखापतीवर उपचार घेत आहे. पुढील महिन्यात तो या कालावधीत आपला उपचार पूर्ण करेल. दुखापत झालेल्या दिवसापासून पुढील ६ महिन्यांपर्यंत तो क्रिकेटपासून दूर राहील.
“आता भुवनेश्वर आयपीएलपर्यंत फीट होईल. कारण तो ६ महिन्यांसाठी स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर झाला आहे,” असे या विषयाची माहिती ठेवणाऱ्या एका सूत्राने आयएएनएसला सांगितले.
याव्यतिरिक्त भुवनेश्वरने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील आपले स्थानही गमावले आहे.
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत भारतीय संघाकडून २१ कसोटी सामने, ११४ वनडे सामने आणि ४३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २६.०९ च्या सरासरीने ६३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने ३४.६० च्या सरासरीने १३२ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने टी२०त २६.५३ च्या सरासरीने ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख
टीम इंडिया, ‘ही’ गोष्ट अजिबात विसरु नका, गंभीरचा सल्ला
‘आम्ही कृष्णवर्णीय लोकांविषयी…’, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा खळबळजनक खुलासा