भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागच्या एका वर्षापेक्षा जास्त काळापासून भुवनेश्वर भारतासाठी खेळला नाहीये. पण रणजी ट्रॉफी 2024 मधून वेगवान गोलंदाजाने जबरदस्त पुनरागमन केले. उत्तर प्रदेशासाठी खेळताना भुवनेश्वरने बंगाल संघाविरुद्ध पहिल्या डावात आठ विकेट्स नावावर केल्या. या प्रदर्शनासोबतच भुवनेश्वरने भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले आहेत.
उत्तर प्रदेश आणि बंगाल क्रिकेट संघ रजणी ट्रॉफी 2024 मध्ये ग्रुप बी मधून खेळत आहेत. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर उभय संघातील हा सामना शुक्रवारी (13 जानेवारी) सुरू झाला. पहिल्या डावात भुवनेश्वर कुमार () याचा उत्तर प्रदेश संघ अवघ्या 60 धावांवर गुंडाळला गेला. मोहम्मद याने 4, सुरज सिंग जयस्वाल याने 3, तर इशान पोरेल याने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात बंगाल संघ देखील अवघ्या 188 धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात बंगाल संघ 58.2 षटकात गुंडाळला गेला. तत्पूर्वी पहिल्या दिवसाखेर बंगालची धावसंख्या 5 बाद 95 दावा होती. विशेष म्हणजे या पाचही विकेट भुवनेश्वरने घेतल्या होत्या.
दुसऱ्या दिवसी बंगाल संघ सर्वबाद झाल्यानंतर भुवनेश्वरने या डावात घेतलेल्या विकेट्सची संख्या 8 झाली. त्याने 22 षटकांमध्ये 41 धावा खर्च करून 8 विकेट्स झटकल्या. यादरम्यान 5 षटके त्याने निर्धाव टाकली. भारतासाठी आपला शेवटचा कसोटी सामना भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेसोबत जानेवारी 2018 मध्ये खेळला होता. दरम्यानच्या सहा वर्षांमध्ये वेगवान गोलंदाज एकदाही ‘रेड बॉल’ क्रिकेट खेळताना दिसला नाही. असे असले तरी, रणजी ट्रॉफी 2024 मधील आपला पहिलाच सामना खेळताना त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
8 WICKET HAUL BY BHUVNESHWAR KUMAR…!!! 🫡
– 8/41 by Bhuvi who’s playing his first FC match in 6 years and he bowled a spell to remember, he’s still one of the best. pic.twitter.com/OLV4AHl8WW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 13, 2024
उभय संघांतील पहिल्या डावाअंती बंगाल संघ 128 धावांनी आघाडीवर आहे. चार दिवसीय सामन्यात दुसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र महत्वाचे ठरू शकते. उत्तर प्रदेशच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात संयमी खेळी करून मोठी धावसंक्या उभी करावी लागणार आहे.
भुवनेश्वर भारतासाठी तिन्ही फॉलमॅटमध्ये खेळला आहे. पण आपला सेवटचा आंतरराष्ट्रीय सामना त्याने नोव्हेंबर 2022 मध्ये खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 प्रकारातील हा सामना होता. त्याने खेळलेला शेवटचा वनडे सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. अशात वेगावन गोलंदाजाला भारतीय संघातील पुनरागमनासाठी येत्या काळात अशाच पद्धतीने फॉर्म टिकवून विकेट्स घ्याव्या लागतील. (Bhuvneshwar Kumar took 8 wickets for Uttar Pradesh in the Ranji match against Bengal)
महत्वाच्या बातम्या –
कर्नाटक संघाला मोठा धक्का, चालू सामन्यात प्रसिध कृष्णा जखमी, उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता
देशांतर्गत क्रिकेटमध्ये या ‘5’ खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी करूनही बीसीसीआयने केलंय दुर्लक्षित