---Advertisement---

IPL 2026 Final: फायनलमध्ये भुवनेश्वर कुमारची ऐतिहासिक कामगिरी! जॉन्सन-बोल्टला मागे टाकत नोंदवला नवा विक्रम

On: रविवार, मे 31, 2026 10:04 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026 Final) अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) पॉवरप्लेमध्ये एक महत्त्वाची विकेट मिळवली. या एका विकेटसह भुवनेश्वरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या एकाच हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला असून, त्याने मिचेल जॉन्सन आणि ट्रेंट बोल्ट यांना मागे टाकले आहे.

पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी!

कगिसो रबाडा: रबाडा या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने आयपीएल 2026 मध्ये पॉवरप्लेदरम्यान एकूण 19 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद शमी: या यादीत दुसरे स्थान मोहम्मद शमीचे आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळताना पॉवरप्लेमध्ये 17 विकेट्स मिळवल्या होत्या. तो हंगाम शमीसाठी अत्यंत यशस्वी ठरला होता.

भुवनेश्वर कुमार: आता भुवनेश्वर कुमारनेही या हंगामात (2026) पॉवरप्लेमध्ये 17 विकेट्स घेत शमीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आरसीबीसाठी खेळताना त्याने या हंगामात आपल्या अचूक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

मिचेल जॉन्सन: हा गोलंदाज आता चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएल 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना पॉवरप्लेमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या.

ट्रेंट बोल्ट: बोल्ट आता पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएल 2020 च्या हंगामात पॉवरप्लेमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने एकाच वेळी जॉन्सन आणि बोल्ट या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---