पुढील वर्षाच्या टी२० लीगसाठी आयोजक देशांची लगबग सुरू झाली आहे. संयुक्त अरब अमिराती व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आपली नवी लीग सुरू करतेय, ज्यासाठी खेळाडूंना करारबद्ध केले जात आहे. त्यानंतर अगदी त्याच वेळेत ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगचा १२ वा हंगाम सुरू होतोय. आता या नव्या हंगामासाठी आयोजकांनी विदेशी खेळाडूंच्या सर्वोच्च कॅटेगरी म्हणजे प्लॅटिनम कॅटेगरीतील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
बिग बॅश २०२३ साठी आयोजकांनी जाहीर केलेल्या प्लॅटिनम कॅटेगरीत बारा खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. या खेळाडूंची किंमत ३ लाख ४० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी असेल. या खेळाडूंमध्ये फाफ डू प्लेसिस, जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, लियाम लिव्हिंगस्टोन, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, डेव्हिड विलि, शादाब खान, ड्वेन ब्राव्हो, राशिद खान, ख्रिस जॉर्डन व ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे.
या खेळाडूंसह एकूण २६ खेळाडू रिटेन्शनसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे मागील वर्षी चांगली कामगिरी केलेल्या लिव्हिंगस्टोन, आंद्रे रसेल व राशिद खान यांना आपापली फ्रॅंचायजी रिटेन शकते. बिग बॅश लीगचा बारावा हंगाम १३ डिसेंबर ते ४ फेब्रुवारी २०२२३ दरम्यान खेळला जाईल. यादरम्यान, ग्रुप स्टेजमध्ये एकूण ५६ सामने खेळले जातील.
दक्षिण आफ्रिकेतील टी२० लीग व युएईतील इंटरनॅशनल लीग टी२० साठी यापूर्वीच काही प्रमुख खेळाडूंनी करार केल्यामुळे, यावर्षी बिग बॅशमध्ये तितके मोठे खेळाडू पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी, ऑस्ट्रेलियातील सर्व प्रमुख खेळाडू बिग बॅश लीग खेळणार असल्याने स्पर्धेची उत्कंठा यावर्षी वाढू शकते असे सांगितले जातेय.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाबाबत मोठी बातमी समोर, ‘या’ देशात केलं जाणार आयोजन
रोहितच्या म्हणण्याने नाही, तर ‘या’ तारखेच्या बैठकीत ठरणार टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
उधारीची जर्सी घालणाऱ्या धवनकडे चाहत्याने मागितला शर्ट, गब्बरची रिएक्शन पाहून तुम्हीही म्हणाल…