ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग सुरू आहे. परंतु, आता या स्पर्धेवर कोरोनाचे सावट येताना दिसत आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा मोठ्या संकटात सापडताना दिसतेय. नुकतेच लीगमधील पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामना कोरोनामुळे पुढे ढकलावा लागला होता. मात्र, आता यापेक्षाही मोठे संकट समोर आले आहे. मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडरचे तब्बल १९ सदस्य (११ खेळाडू) कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘दोन्ही संघ आगामी संघाचे सामने आयोजित करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत चर्चा करत आहेत. सिडनी थंडर्सच्या संघाने आजच्या सामन्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधत सल्ला घेतला. सिडनी थंडर्सशिवाय मेलबर्न स्टार्सचे ८ खेळाडूही कोरोनाच्या विळख्यात आहेत. या कठीण काळात क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रकरण गांभीर्याने हाताळत आहे. कोरोनाची प्रकरणे अशीच वाढत राहिल्यास ही स्पर्धा पुढे ढकलावी लागू शकते.’
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी, अनेक कोरोना रुग्ण आढळले आहेत. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनाही याचा फटका बसला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज ट्रेव्हिस हेडही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे, त्यामुळे त्याला सिडनी कसोटीतून बाहेर करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया संघात पॉझिटिव्ह खेळाडू आढल्याने कसोटी संघात तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, त्यात अष्टपैलू मिचेल मार्श, निक मॅडिसन आणि यष्टीरक्षक जोस इंग्लिश यांचा समावेश आहे. या नियोजनानुसार ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडचे दोन्ही संघ स्वतंत्रपणे सिडनीला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या-