भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित होऊ शकते. सर्व परदेशी खेळाडूंना परत पाठवले जाऊ शकते. यासंबंधित बीसीसीआयने अचानक एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स चालू सामना रद्द करण्यात आला.
दिल्ली-पंजाब सामना अचानक रद्द करण्यात आल्यामुळे बीसीसीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे. धर्मशालामधून काल 8 मे रोजी सर्व खेळाडूंना, सहयोगी स्टाफ आणि ब्रॉडकास्ट क्रू मधून काढण्यात येणार आहे. बीसीसीआय आयपीएल संबंधित त्या सर्व लोकांना ऊना खास ट्रेन मधून घेऊन जावू शकते. दिल्ली-पंजाब सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना सुरक्षितपणे स्टेडियमच्या बाहेर काढण्यात आले. सूत्रांनुसार बीसीसीआयच म्हणणं आहे की, खेळाडूंच्या सुरक्षेत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही.
भारत-पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या संघर्षामुळे आयपीएल 2025 स्पर्धेवर मोठा निर्णय आज 9 मे रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीच बीसीसीआयने आयपीएल संबंधित मोठ्या बैठकीचे तातडीने निर्देश जाहीर केले आहेत. आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित करण्यात येऊ शकते.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात 10.1 षटकांचा सामना खेळण्यात आला. पंजाब संघ प्रथम फलंदाजी करत होता. पंजाबने 10.1 षटकात एक खेळाडू गमावून 101 धावा केल्या होत्या. या सामन्यात प्रियांश आर्यने 70 धावांची शानदार पारी खेळली. प्रभसिमरन सिंगने 50 धावा केल्या. प्रियांश बाद झाल्यानंतर श्रेयस मैदानावर आला, पण त्याच दरम्यान अचानक सर्व लाइट्स बंद करण्यात आल्या. तसेच सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.






