न्यूझीलंड संघाचा दिग्गज वेगवान गोल्ंदाज कायल जेमिसन पुन्हा एकदा दुखापतीचा शिकार झाला आहे. यावेळीही जेमिसनच्या पाठिला दुखापत झाली असून यामुळे त्याला मोठ्या काळापार्यंत क्रिकेट खेळता येणार नाहीये. माध्यमांतील वृत्तांनुसार पुढच्या एका वर्षांपर्यंत जेमिसन आता क्रिकेट खेळू शकणार नाहीये. मागच्या दोन वर्षांमध्ये तो सतत दुखापतीचा सामना करत राहिला आहे. वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता.
कायम जेमिसन (Kyle Jamieson) याच्यावर मागच्याच वर्षी मोठी शस्त्रक्रिया पार पडली होती. आता नुकतीच झालेली दुखापत देखील त्याच जागेवर झाल्याचे सांगितले जात आहे. 2022 मध्ये त्याला पहिल्यांदा दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर जवळपास एक वर्ष तो संघातून बाहेर राहिला. फेब्रुवारी 2023 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन केले. पण एकही सामना खेळण्याआधीच त्याला पुन्हा दुखापत झाली. याच कारणास्तव मागच्या वर्षी तो इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला नाही. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये राखीव खेळाडू म्हणून स्थान दिले गेले होते.
आपल्या दुखापतीची माहिती देताना कायल जेमिसन “मागचे काही वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक राहिले आहेत. पण यादरम्यानच्या काळात माझी सोबती, माझे कुटुंब, संघातील खेळाडू, सोपर्ट स्टाफ आणि मेडिकल तज्ञ यांनी मला सहकार्य केले. त्यांच्या मदतीसाठी आभारी आहे. मला माहीत आहे की, दुखापत ही कोणत्याही क्रिकेटपटूच्या आयुष्याचा भाग असते. माझे वय पाहता, अशी आशा आहे की, मी अजून बरेच क्रिकेट खेळू शकतो.”
नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत जेमिन्सन खेळला. मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 281, तर दुसऱ्यासामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कायल जेमिसन याने एकूण 6 विकेट्स नावावर केल्या. (Big blow to New Zealand! Legendary player out of team for a year, find out why)
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफी खेळली नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम, BCCI चा खेळाडूंना थेट इशारा
IND vs ENG : लंच-ब्रेकनंतर इंग्लंड 319 वर ऑलआऊट, टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी