ऍडम झाम्पा आगामी आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. पण ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने आगामी आयपीएल हंगाम सुरू व्हायला अवघ्या काही तासांचा वेळ बाकी असताना मोठा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सला हंगामातील आपला पहिला सामना रविवारी (24 मार्च) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी झाम्पाच्या निर्णयाने संघाची डोकेदुखी वाढली आहे.
आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार फिरकीपटू ऍडम झाम्पा (Adam Zampa) वैयक्तिक कारणास्तव आगामी आयपीएल खेळू शकणार नाही. आयपीएल 2024 हंगामातून तो माघार घेत असल्याची माहिती फिरकीपटू गोलंदाजाने दिली. आयपीएल 2024च्या लिलिवापूर्वी राजस्थान रॉयल्सने झाम्पाला रिटेन केले होते. मागच्या हंगामात त्याने 6 सामने खेळले आणि 8 विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेऊन तो राजस्थानसाठी मॅच विनर ठरला होता. त्याआधी झाम्पा आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग राहिला आङे. त्याने आतापर्यंत 20 आयपीएल सामने खेळले असून 29 विकेट्स घेतल्या आहेत.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा क्वाड्रिसेप्स शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला होता. फ्रँचायझीने आतापर्यंत वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि ऍडम झाम्पा या दोघांच्या बदली खेळाडूची घोषणा केली नाहीये. आयपीएल 2024च्या मिनी लिलावात राजस्थान रॉयल्सने पाच खेळाडूंना संघात समाली केले. यात रॉवमन पॉवेल (7.4 कोटी), शुभम दुबे (5.80 कोटी), टॉम कॅडमोर (40 लाख) आणि नांद्रे बर्गर (50 लाख) यांचा समावेश आहे. (Big blow to Rajasthan Royals, just in time Australian bowler out of IPL season)
महत्वाच्या बातम्या –
धवननं पंजाब किंग्जचं कर्णधारपद गमावलं? फोटो सेशनला का उपस्थित नव्हता भारतीय दिग्गज
खेळला तीच धोनीची कॅप्टन म्हणून शेवटची मॅच! पाहा आयपीएल 2023 फायनलचा इमोशनल व्हिडिओ