क्रिकेट विश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याच्याबाबत धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (दि. 04 जुलै) रात्री उशिरा प्रवीण कुमारचा कार अपघात झाला. एका वेगवान ट्रकने टक्कर मारली. ही दुर्घटना मेरठमधील आयुक्तांच्या घराच्या जवळ झाली. अपघातात प्रवीण कुमार याला दुखापत झाली नाहीये. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रकचालकाला अटक केली.
प्रवीण कुमार (Praveen Kumar) बागपत रोडवरील मुलतान नगर येथे राहतो. तो रात्री जवळपास 10 वाजता पांडव नगरहून परतत होता. यावेळी त्याची कार लँड रोव्हरमध्ये त्याच्यासोबत त्याचा मुलगाही होता. तो जसा आयुक्तांच्या घराच्या जवळ पोहोचला, समोरून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने त्याच्या कारला टक्कर मारली. यावेळी कारचे मोठे नुकसान झाले. मात्र, प्रवीण आणि त्याच्या मुलाला दुखापत झाली नाही. या घटनेनंतर तिथे गर्दी जमा झाली. तसेच, त्याने चालकालाही पकडले. (big breaking former india fast bowler praveen kumar car hit by a canter in meerut)
घटनेची माहिती मिळताच सिवील लाईन्स ठाण्यातील पोलिसही लगेच घटनास्थळी पोहोचले. एसपी सिटी पीयुष कुमार म्हणाले की, “ट्रक ड्रायव्हरला पकडले आहे आणि त्याला पोलीस ठाण्यात पाठवले आहे.” यावेळी त्यांनी प्रवीण आणि त्यांचा मुलगा सुरक्षित असल्याचेही सांगितले आहे.
प्रवीण कुमार या भीषण अपघातात बचावला आहे. ज्या चालकाना प्रवीणच्या गाडीला धडक मारली, त्याने नियमांचे पालन न केल्याची शिक्षा मिळणे निश्चित आहे. मात्र, कार अपघातात वाचण्याची ही प्रवीणची पहिलीच वेळ नाहीये. सन 2007मध्येही माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार एका ओपन जीपमधून पडला होता. त्यावेळी त्याच्या मेरठ शहरात त्याच्या पुनरागमनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवीणची कारकीर्द
प्रवीण याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. वेगवान गोलंदाज प्रवीणला त्याच्या स्विंगसाठी ओळखले जायचे. त्याने 2007 ते 2011 यादरम्यान भारतीय संघाकडून 68 वनडे सामने खेळताना 77 विकेट्स चटकावल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या या गोलंदाजाला कसोटीत जास्त संधी मिळाली नाही. त्याने फक्त 6 कसोटी खेळत 27 विकेट्स नावावर केल्या. तसेच, 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने 8 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
महत्वाच्या बातम्या-
संघ विश्वचषकातून बाहेर पडताच कर्णधाराने दिला राजीनामा, क्रिकेटविश्वात खळबळ
‘आताचे खेळाडू फक्त पैशासाठी…’, वेस्ट इंडिजला विश्वचषकातून बाहेर पडताना पाहून हळहळले चॅम्पियन खेळाडू