---Advertisement---

दिग्गज अष्टपैलू जिवंत, निधनाची बातमी निघाली फेक; माजी खेळाडूची पुष्टी

On: बुधवार, ऑगस्ट 23, 2023 10:58 AM
Heath-Streak
---Advertisement---

मंगळवारी (दि. 22 ऑगस्ट) झिम्बाब्वेचा माजी दिग्गज कर्णधार हीथ स्ट्रीक याचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी जगभरात व्हायरल झाली. यानंतर स्ट्रीकवर चाहत्यांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. मात्र, आता ही बातमी खोटी असल्याचे झिम्बाब्वेचा माजी खेळाडू हेन्री ओलोंगा याने सांगितले आहे.

माजी क्रिकेटपटू हेन्री ओलोंगा (Henry Olonga) याने एक्स/ट्वीट करत हीथ स्ट्रीक हा जिवंत असल्याची माहिती दिली. त्याने लिहिले की, “मी पुष्टी करू शकतो की, हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा अतिशयोक्तीपूर्ण आहेत. मी हे नुकतेच त्याच्याकडून ऐकले. तिसऱ्या पंचांनी त्याला परत बोलावले आहे. तो जिवंत आहे.”

https://twitter.com/henryolonga/status/1694212344732357101

काय म्हणाला हीथ स्ट्रीक?
हीथ स्ट्रीक म्हणाला की, “ही पूर्णपणे अफवा आणि खोटे आहे. मी जिवंत आहे आणि बरा आहे. मला हे जाणून खूप वाईट वाटले की, कोणीतरी वरवर पाहता खोटी माहिती पसरवली जाऊ शकते. मला विश्वास आहे की, ज्या कुणी ही बातमी दिली, त्या स्त्रोताने माफी मागितली पाहिजे, मी या बातमीने मी दुखावलो आहे.”

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1694224459857904089

क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी सोर येताच जगभरातील क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली. त्यात भारतीय खेळाडूंचाही समावेश होता. आर अश्विन आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करत स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, हीथ स्ट्रीक जिवंत (Heath Streak Alive) असल्याची बातमी येताच दोघांनीही ट्वीट डिलीट केले. अश्विनने ट्वीट करत लिहिले होते की, “हीथ स्ट्रीक आपल्यात नाही. दु:खद! खूपच दु:खद. आरआयपी.”

Ashwin-Tweet
Photo Courtesy: Twitter/ashwinravi99

स्ट्रीक जिवंत असल्याचे हेन्री ओलोंगा याचे ट्वीट रिट्वीट करत सेहवागने लिहिले की, “हेन्री तू ही पुष्टी केल्याबद्दल धन्यवाद. यमराजजींनी निर्णय बदलल्याने खूप आनंद झाला.”

https://twitter.com/virendersehwag/status/1694218779826479376

हीथ स्ट्रीकची कारकीर्द
अष्टपैलू हीथ स्ट्रीक याने झिम्बाब्वे क्रिकेट संंघाकडून 65 कसोटी सामने खेळताना एकूण 216 विकेट्स आणि 1990 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर एका शतकाचा आणि 11 अर्धशतकांचीही नोंद आहे. तसेच, त्याने 189 वनडे सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 239 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त फलंदाजी करताना त्याने वनडेत 2943 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 13 अर्धशतकेही झळकावली आहेत. (big breaking zimbabwean legend heath streak confirms hes alive)

हेही वाचा-
The Hundred लीगमध्ये घोंगावलं हॅरी ब्रूक नावाचं वादळ, ठोकलं स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक
वनडे वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडची जोरदार तयारी! एकसाथ 4 दिग्गज कोचिंग स्टाफमध्ये

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---