आशिया चषक 2023चा वाद अद्याप मिटला नाहीये. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आशिया चषकाचे यजमानपद असेल, तर भारतीय संघा या स्पर्धेत सहभाग घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. सोबतच पाकिस्तानने मांडलेल्या हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव देखील बीसीसीआयला मान्य नाहीये. अशातच आता बातमी येत आहे की, आशिया चषकाच्या मुद्यावरून बांगलादेश आणि श्रीलंका पाकिस्तानच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माडलेल्या हायब्रिड मॉडेलनुसार भारतीय संघा त्यांचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर खेळेल. आशिया चषकातील इतर सर्व देशांचे सामने मात्र पाकिस्तानमध्येच आयोजित केले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव मागच्या बऱ्याच वर्षांपासून पाकिस्तानात खेळत नाही. अशात यावेळीही बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बीसीसीआयला पीसीबीने माडलेले हायब्रिड मॉडेल देखील मान्य नाहीये. असे असले तरी, माध्यमांमध्ये असा बातम्या समोर येत आहेत की, बंगालादेश आणि श्रीलंका क्रिकेट संघांना हे हायब्रिड मॉडेल मान्य आहे. बीसीबी आणि एसएलसीने हायब्रिड मॉडेलशी त्यांना कोणतीच आपत्ती नसल्याचे बोलले आहे.
अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांना आशियाई क्रिकेट परिषदेकडे (ACC) यासंदर्भात अर्ज केला आहे. अशात बीसीसीआय सचिव आणि एसीसी अध्यक्ष जय शह येत्या दोन दिवसांमध्ये या अर्जावर आपली भूमिका स्पष्ट करतील. मात्र, या अर्जाचा बीसीसीआयच्या निर्णयावर काही परिणाम पडेल, असे दिसत नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बोर्ड आशिया चषक पाकिस्तानबाहेर आयोजित करण्याच्या मुद्यावर ठाण आहे.
या अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी हा अर्ज पाहिला नाहीये, पण आमचे मत बदलले नाहीये. आमची इच्छा आहे की, स्पर्धा तटस्था स्थानावर केळले जावे, यूएईत नाही. त्याठिकाणी खूप गर्मी आहे आणि आम्ही खेळाडू्ंच्या फिटनेसविषयी अजून जोखीम घेऊ इच्छित नाहीत. श्रीलाक या स्पर्धेसाठी चांगले ठिकाण आहे. आतापर्यंत आम्ही या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला नाहीये. आधी परिस्थिती समजून घेऊ आणि नंतर याविषयी निर्णय घेऊ.”
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील राजकीय तनाव फारच वाढल्याचे दिसले. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडकेची चर्चा जगभरात झाली. अशात आशिया चषकासारखी मोठी स्पर्धा याठिकाणी आयोजित करणे जोखिमेचे ठरू शकते. भारतीय संघासाठी ही इतरांपेक्षा केवाही जास्तच आहे, कारण दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि धार्मिक मतभेत नेहमीच पाहायला मिळाले आहेत. (Big news about the Asia Cup! Bangladesh-Sri Lanka in support of Pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे प्रदर्शन त्यांच्यासाठीच…’, विजयाच्या एक दिवस आधीपर्यंत आयसीयूत होते मोहसिनचे वडील
मोहसिन खानच्या जोरावर लखनऊने मुंबईला चारली पराभवाची धूळ, प्ले-ऑफचे तिकीट अजूनही दूर