क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने मंगळवारी (दि. 7 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. फिंच हा ऑस्ट्रेलियाचा टी20 क्रिकेट कर्णधार होता. फिंचच्या निवृत्तीची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. फिंचच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे.
ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने ऑस्ट्रेलियाला 2021सालचा टी20 विश्वचषक जिंकून दिला होता. त्याच्या नावावर 2019च्या वनडे विश्वचषकात वैयक्तिक 507 धावांची नोंदही आहे.
https://www.instagram.com/p/CoVvA-lryOz/?hl=en
काय म्हणाला फिंच?
निवृत्तीबाबत बोलताना निवृत्ती घेणाऱ्या 36 वर्षीय ऍरॉन फिंच (Aaron Finch Retirement) याने एका निवेदनात म्हटले की, “मला याची जाणीव आहे की, मी आता 2024चा टी20 विश्वचषक खेळू शकणार नाही. अशात मी निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आहे, ज्यामुळे संघाला त्यांच्या पुढील रणनीतीवर का करता येईल. मी माझे कुटुंब, पत्नी, संघ, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांना धन्यवाद देतो. त्यांनी माझ्या संपूर्ण कारकीर्दीदरम्यान मला पाठिंबा दिला. त्या चाहत्यांनाही मनापासून धन्यवाद, ज्यांनी सातत्याने मला पाठिंबा दिला. 2021 टी20 विश्वचषक जिंकणे आणि 2015 सालच्या वनडे विश्वचषक जिंकणे माझ्या कारकीर्दीतील सर्वात खास आठवणी राहणार आहेत. या 12 वर्षांमध्ये आपल्या देशासाठी खेळणे, काही शानदार खेळाडूंचा सामना करणे, हा तो सन्मान आहे, जो सर्वांना हवा आहे.”
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1622783648369086464
फिंचची कारकीर्द
ऍरॉन फिंच याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने कसोटीत 2018, वनडेत 2013 आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2011मध्ये पदार्पण केले होते. कसोटीत त्याने 5 सामने खेळताना 27.8च्या सरासरीने 278 धावा केल्या होत्या. वनडेत त्याने 146 सामन्यात 38.89च्या सरासरीने 5406 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 103 सामने खेळताना 34.29च्या सरासरीने 3120 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, टी20तील त्याची 172 ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 19 शतके (वनडे-17, टी20-2) झळकावली आहेत.
मात्र, आता फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतासोबतच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकात पाकिस्तानला भिडण्यापूर्वी मितालीचा टीम इंडियाला सल्ला; म्हणाली, ‘वरची फळी फॉर्मात, पण…’
बापरे, एवढा विश्वास! श्रीलंकन दिग्गज म्हणतोय, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत ‘हा’ संघ 2-1ने गुंडाळेल मालिका