---Advertisement---

Shocking: ‘या’ क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांकडून अटक, रिषभ पंतला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुना

Rishabh-Pant
---Advertisement---

Mrinank Singh Arrested: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. 19 वर्षांखालील क्रिकेट खेळलेला खेळाडू मृणांक सिंग याला नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिसांनी अटक केली आहे. मृणांक सिंगला अटक करण्यामागील कारण फसवणूक असल्याचे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे, मृणांकवर भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचीही फसवणूक केली होती. आता पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे तो चर्चेत आहे.

मृणांक सिंगला अटक
क्रिकेटपटू मृणांक सिंग (Mrinank Singh) याला हॉटेल ताज पॅलेसची 5.53 लाख रुपयांची फसवणूक केली होती. याव्यतिरिक्त भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हादेखील महागडे घड्याळ घेण्याच्या नादात शिकार बनला होता. त्याच्याशी आरोपी मृणांक सिंग याने 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

बुधवारी (दि. 27 डिसेंबर) दिल्ली पोलिसांनी मृणांकला अटक केली, ज्याने स्वत:ला हरियाणाचा क्रिकेटपटू सांगितले होते. तसेच, त्याने मागील काही वर्षांपासून लोकांची पैशांची फसवणूकही केली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याने जुलै 2022मध्ये ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केली होती. त्यावेळी त्याने सांगितले होते की, तो आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तो जुलै 2022मध्ये जवळपास 7 दिवस हॉटेलमध्ये थांबला आणि जवळपास 5.53 लाख रुपयांचे बिल न भरताच हॉटेलमधून गेला होता.

पंतची केली होती फसवणूक
आरोपी मृणांक सिंगने कर्नाटकच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून पूर्ण भारतात लक्झरी हॉटेल मालकांची फसवणूक केली. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतचे नावही सामील आहे. मृणांकने पंतला लक्झरी घड्याळ स्वस्त दरात घेऊन देण्याचे आमिष दाखवले होते. मृणांकने पंतसोबत 2020मध्ये 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. (big news delhi police arrested former haryana cricketer mrinank singh who duped cricketer rishabh pant and many hotel owners)

हेही वाचा-
INDW vs AUSW: वानखेडेत टीम इंडियाने जिंकला टॉस, करणार पहिली…
लांब केस का ठेवतोय धोनी? विश्वविजेत्या माजी कर्णधाराने स्वत:च केलाय खुलासा; व्हिडिओ पाहून व्हाल खुश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---