---Advertisement---

इंग्लंडचा हुकमी एक्का ऍशेस 2023मधून बाहेर, लगेच वाचा

On: मंगळवार, जुलै 4, 2023 5:41 PM
Ollie-Pope
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस मालिका 2023मधून मोठी बातमी समोर येत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघाचा मधल्या फळीतील फलंदाज ऑली पोप ऍशेस 2023मधून बाहेर पडला आहे. याची माहिती आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डांनी दिली आहे. खरं तर, इंग्लंड संघ कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाला आहे. अशात तिसरा कसोटी सामना 6 जुलैपासून खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच पोप मालिकेतून बाहेर पडणे इंग्लंडसाठी मोठा धक्का मानले जात आहे.

कशी झाली दुखापत?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील लॉर्ड्स कसोटी (Lord’s Test) सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऑली पोप (Ollie Pope) दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डाव्या खांद्याच्या हाडाला दुखापत झाली होती. पहिल्या दोन कसोटीत पोपला खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात अनुक्रमे 31 आणि 14 धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्याने 42 आणि 3 धावा करून तंबूचा रस्ता पकडला होता. खरं कर, पोप इंग्लंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो.

कशी आहे पोपची कसोटी कारकीर्द?
पोप याने त्याचा पहिला कसोटी सामना 2018मध्ये भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत 38 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 67 डावात 34.45च्या सरासरीने 2136 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान 4 शतके आणि 11 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. त्याच्या बॅटमधून एक द्विशतकही निघाले आहे. पोप याची सर्वोत्तम धावसंख्या ही 205 इतकी राहिली आहे. यादरम्यान तो 5 वेळा नाबाद राहिला आहे. तो इंग्लंड संघाकडून एकाही वनडे आणि टी20 सामन्यात खेळला नाहीये.

पोपच्या जागी कुणाला मिळू शकते संधी?
पोपच्या जागी भारतीय संघात डेन लॉरेन्स याला संधी मिळू शकते. लॉरेन्स ऍशेस संघाचा भाग आहे. त्याने इंग्लंडसाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 21 डावात 29च्या सरासरीने 551 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान 91 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. यामध्ये 4 अर्धशतकांचाही समावेश राहिला आहे. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर लॉरेन्सने 113 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 36.66च्या सरासरीने 6050 धावा केल्या आहेत. (big news england batsman ollie pope out of entire ashes 2023 series due to shoulder injury read more)

महत्वाच्या बातम्या-
अशी वेळ कुणावरही येऊ नये! वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हरभजन जोरदार ट्रोल, नेटकरी म्हणाला, ‘पेग लावून…’
हरमनवर वनडे रँकिंगमध्ये, तर मितालीवर ‘या’ विक्रमात श्रीलंकेची कॅप्टन भारी; 60 चेंडूमुळे रेकॉर्ड उद्ध्वस्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---