---Advertisement---

बेन स्टोक्सपुढे न्यूझीलंडच्या 11 खेळाडूंनी टेकले गुडघे, इंग्लंडचा 181 धावांनी ऐतिहासिक विजय

On: गुरूवार, सप्टेंबर 14, 2023 11:55 AM
Ben-Stokes-And-Dawid-Malan
---Advertisement---

जगभरातील क्रिकेट संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी जोरदार तयारी करत आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका संघ आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळत आहेत. दुसरीकडे, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातही 4 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात इंग्लंडच्या पराभवासोबत झाली. मात्र, त्यानंतर इंग्लंडने पुढील दोन सामने जिंकत मालिकेत दमदार पुनरागमन केले. बुधवारी (दि. 13 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 181 धावांनी विजय झाला. या विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्स ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 48.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 368 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 39 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 187 धावा करू शकला. त्यामुळे हा सामना इंग्लंडने 181 (England win by 181 runs) धावांनी जिंकला.

https://twitter.com/ICC/status/1702103857533505834

बेन स्टोक्सने चोपल्या 182 धावा
या सामन्यात इंग्लंडकडून खेळताना बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. त्याने 124 चेंडूत सर्वाधिक 182 धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 9 षटकार आणि 15 चौकारांची बरसात झाली. विशेष म्हणजे, स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धा पाहता त्याने देशासाठी निवृत्तीतून माघार घेतली. स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध साकारलेली ही खेळी इंग्लंडसाठी कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोत्तम धावसंख्या आहे. इंग्लंडचा खेळाडू जेसन रॉय याने 2018मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 धावांची खेळी साकारली होती.

स्टोक्स आणि मलानचे वादळ
या सामन्यात स्टोक्सने सलामीवीर डेविड मलान (Dawid Malan) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी रचली. सलामीवीर मलानला शतकासाठी 4 धावा कमी पडल्या. त्याने 96 धावा केल्या. कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने 38 धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने 20 धावांचा आकडा पार केला नाही.

यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना पुनरागमन करणारा ट्रेंट बोल्ट (Trent Boult) चमकला. त्याने 9.1 षटके गोलंदाजी करताना 51 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त बेन लिस्टर यानेही 3 विकेट्स घेतल्या. तसेच, लॉकी फर्ग्युसन आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

न्यूझीलंडचा 181 धावांनी पराभव
इंग्लंडच्या 369 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. यावेळी न्यूझीलंडकडून यष्टीरक्षक ग्लेन फिलिप्स यानेच सर्वाधिक धावा केल्या. त्याने 76 चेंडूत 78 धावांचे योगदान दिले. यामध्ये 2 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.

यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना ख्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी शानदार प्रदर्शन केले. दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या. याव्यतिरिक्त रीस टोप्लेने 2, तर सॅम करन आणि मोईन अली यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील चौथा आणि अखेरचा सामना 15 सप्टेंबर रोजी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंड मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. तसेच, इंग्लंड हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. (big news england beat new zealand by 181 runs in eng vs nz 3rd odi read )

हेही वाचा-
वर्ल्डकप 2023साठी 10 पैकी 7 संघांनी घोषित केले Squad, पाकिस्तानसह ‘या’ 3 Team अजूनही बाकी
‘विराट कोहली एवढी शतके ठोकेल, जेवढी…’, माजी पाकिस्तानी कर्णधाराची विचित्र भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---