भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला होता. आयसीसी ट्रॉफी गमावल्यानंतर सातत्याने भारताच्या कर्णधारपदाबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. अशात माजी भारतीय निवडकर्ते भूपिंदर सिंग यांनी सांगितले आहे की, बीसीसीआयने एमएस धोनीला कर्णधार का बनवलं होतं. चला तर, सविस्तर जाणून घेऊयात…
भारतीय संघाने 2013मध्ये महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या रूपात शेवटची आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकूण 4 आयसीसी अंतिम सामने आणि अनेक उपांत्य सामन्यात भारतीय संघ पराभवाचा सामना करत आला आहे. धोनी भारताला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव कर्णधार आहे. तसेच, माजी निवडकर्त्यांनी धोनीला कर्णधार बनवण्यामागे काय कारण होते, हे सांगितले आहे.
भूपिंंदर सिंग (Bhupinder Singh) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “संघात आपोआप निवड होण्याव्यतिरिक्त तुम्ही खेळाडूचे क्रिकेट कौशल्य, त्याची देहबोली, पुढे येऊन नेतृत्व करण्याची क्षमता आणि मॅन मॅनेजमेंटचे कौशल्य पाहता. आम्ही खेळाप्रती धोनीचा दृष्टिकोण, देहबोली, इतरांशी बोलण्याची पद्धत पाहिली आणि आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली.”
धोनीच्या नेतृत्वानंतर भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र, आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात संघ सपशेल फ्लॉप ठरला आहे. विराट कोहली भारतीय कसोटी संघाला नवीन उंचीवर घेऊन गेला. मात्र, तोही संघाला या कोणत्याच क्रिकेट प्रकारात आयसीसी ट्रॉफी जिंकून देऊ शकला नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार भारतीय संघ
पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये भारतीय संघाला 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौरा करायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होईल. तसेच, दौऱ्यातील अखेरचा सामना 13 ऑगस्ट रोजी फ्लोरिडा येथील आंतरराष्ट्रीय टी20 सामन्याच्या रूपात खेळला जाईल. (big news former selector bhupinder singh explain why bcci appointed ms dhoni as captain read here)
महत्वाच्या बातम्या-
जिम व्हिडिओमुळे विराट वाईटरीत्या ट्रोल; नेटकऱ्यांनी रोखठोक विचारला प्रश्न, ‘काय फायदा अशा व्यायामाचा?’
पाकिस्तानच्या 22 वर्षीय युवा खेळाडूला पंतच्या बॅटिंग स्टाईलची भुरळ; म्हणाला, ‘मलाही रिषभसारखं…’