आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारताने स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 पदकांचा टप्पा पार केला. अशात शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) भारतीयांसाठी सुवर्ण सकाळ झाली. कांस्य पदकानंतर तिरंदाजी खेळात भारताला सुवर्ण पदक मिळाले. भारताच्या ज्योति सुरेखा वेन्नम हिने तिरंदाजीच्या अंतिम सामन्यात शानदार प्रदर्शन करत दणदणीत विजय साकारला. ज्योतिने दक्षिण कोरियाच्या सो चे खेळाडूला पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले. यापूर्वी आदिती स्वामी हिने तिरंदाजी खेळात भारताला कांस्य पदक जिंकून दिले होते. अशाप्रकारे एकूण 97 पदके जिंकत भारताची 100हून अधिक पदके निश्चित झाली आहेत.
ज्योति वेन्नम (Jyothi Vennam) हिने कंपाऊंड वैयक्तिक अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा 149-145ने पराभव केला. या विजयासह तिने सुवर्ण पदक (Gold Medal) आपल्या नावावर केले. ज्योतिने यापूर्वीही दमदार कामगिरी केली आहे. तिने कंपाऊंड महिला संघाच्या खेळातही चांगली कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले होते. ज्योतिने मिश्र संघाच्या फेरीतही विजय मिळवत भारताला सुवर्ण पदक पटकावून दिले. अशाप्रकारे ती तीन सुवर्ण पदकांची भागीदार बनली.
GOLD MEDAL 🔥
Archery: Jyothi Vennam beat So Chae-won of South Korea 149-145 in Compound Individual Final.
📸 @worldarchery #AGwithIAS #IndiaAtAsianGames #AsianGames2022 pic.twitter.com/L5e7IxXw8q
— India_AllSports (@India_AllSports) October 7, 2023
शनिवारी भारताची सुरुवात कांस्य पदकाने झाली. आदिती स्वामी हिने कंपाऊंड वैयक्तिक फेरीत विजय मिळवत कांस्य पदक पटकावले. आदितीने इंडोनेशियाच्या खेळाडूचा पराभव केला. विशेष म्हणजे, आदिती सध्या फक्त 17 वर्षांची आहे. तिने अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघाच्या फेरीतही सुवर्ण पदक जिंकले होते.
खरं तर, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारताच्या तिरंदाजी संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. भारताला संघाच्या फेरीत सुवर्णपदक मिळाले आहे. आदिती स्वामी, ज्योति वेन्नम आणि परनीत कौर (Parneet Kaur) यांनी शानदार प्रदर्शन करत कंपाऊंड खेळात यशाला गवसणी घातली होती. तसेच, भारताला मिश्र संघाच्या फेरीतही सुवर्णपदक मिळाले आहे. अशाप्रकारे भारताच्या नावावर आता 100 हून अधिक पदके निश्चित झाली आहेत. (big news from asian games 2023 india jyothi vennam won gold medal in compound individual final)
हेही वाचा-
BREAKING: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये केला सुवर्णपदकावर कब्जा, जपानचा उडवला धुव्वा
आशियाई गेम्समध्ये भारताने घडवला इतिहास, पहिल्यांदाच झळकावले पदकांचे ‘शतक’