इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धा जवळ आली आहे. या स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्स संघाने रिटेन केले होते, पण मुंबई इंडियन्सने त्याला ट्रेड केल्यामुळे हार्दिक पंड्या संघात परतला आहे. ही माहिती आयपीएलने सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
किती रुपयांना झाला ट्रेड?
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून 15 कोटी रुपयांना ट्रेड केले आहे. हा पंड्याचा आयपीएल पगार असणार असून यामध्ये इतर ट्रान्सफर फीचाही समावेश आहे.
📢 Announced!
𝗛𝗮𝗿𝗱𝗶𝗸 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 ➡️ 𝗠𝘂𝗺𝗯𝗮𝗶 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻𝘀
𝗖𝗮𝗺𝗲𝗿𝗼𝗻 𝗚𝗿𝗲𝗲𝗻 ➡️ 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲#IPL pic.twitter.com/oyuAtP7Q27
— IndianPremierLeague (@IPL) November 27, 2023
पंड्याचे पुनरागमन
खरं तर, हार्दिक पंड्या (Hardik Pandya IPL 2024) याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात 2015मध्ये केली होती. त्याला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने 10 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले होते. तो 2015 ते 2021 यादरम्यान संघाचा भाग होता. तो 2015, 2017, 2019 आणि 2020 या हंगामाचा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, आयपीएल 2022च्या मेगा लिलावात त्याला मुंबईने रिलीज केले होते. असे असले, तरीही दोन वर्षांनंतर पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला.
पंड्याची आयपीएल कारकीर्द
पंड्याने मुंबई इंडियन्स संघाकडून 2015 ते 2021 अशी 7 वर्षे खेळला. यादरम्यान त्याने मुंबईकडून तब्बल 92 सामने खेळले. यातील 85 डावात त्याने 1476 धावा केल्या आहेत. 91 ही त्याची मुंबईकडून खेळतानाची सर्वोत्तम धावसंख्या होती. यादरम्यान त्याने 97 चौकार आणि 98 षटकारांचीही बरसात केली होती. तसेच, मुंबईकडून खेळताना 60 डावांमध्ये 42 विकेट्सही घेतल्या. (big news gujarat titans release hardik pandya moves to mumbai indians read here more)
हेही वाचा-
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया
‘मी निर्भीड होऊन…’, Player of The Match बनताच यशस्वी जयसवालचा मोठा खुलासा