बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ पर्थच्या मैदानावर (22 नोव्हेंबर) रोजी भिडणार आहेत. दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघ सध्या पर्थच्या मैदानावर घाम गाळताना दिसत आहेत. तत्पूर्वी काही दिवसापूर्वी भारताचा युवा स्टार खेळाडू शुबमन गिलला (Shubman Gill) सरावादरम्यान दुखापत झाली होती. आता त्याच्या या दुखापतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
वास्तविक, शुबमन गिलचा (Shubman Gill) अंगठा फ्रॅक्चर झाल्याची बातमी आली होती. पण रेव्हस्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला नाही आणि तो लवकरच मैदानात परतू शकतो. पण यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. गिलची दुखापत आठवडा किंवा दहा दिवसांत बरी होऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. बीसीसीआयने (BCCI) गिलच्या दुखापतीबाबत कोणतेही अपडेट दिले नाही.
शुबमन गिलची दुखापत गंभीर नाही. त्यामुळे पर्थ कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त होऊ शकतो. मात्र, असे असतानाही भारतीय संघ व्यवस्थापन त्याला ब्रेक देऊ शकते. यामुळे गिलला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ मिळेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गिल पुन्हा मैदानात उतरू शकतो.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
BGT; विराट कोहलीला OUT कसे करायचे? ऑस्ट्रेलिया दिग्गजाने सांगितला प्लॅन!
IND vs AUS: विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा, माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
IPL 2025: हे खेळाडू आरसीबी मध्ये परतणार? हा सर्वात मोठा दावेदार!