---Advertisement---

वर्ल्डकप 2023मध्ये आयसीसीकडून सचिनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान

On: बुधवार, ऑक्टोबर 4, 2023 8:59 AM
Sachin-Tendulkar
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मात्र, याच्या दोन दिवसाआधी म्हणजेच मंगळवारी (दि. 03 ऑक्टोबर) महत्त्वाची घोषणा झाली. आयसीसी क्रिकेट बोर्डाने आगामी विश्वचषक स्पर्धेच्या ग्लोबल ब्रँड एंबेसेडरच्या नावाचा खुलासा केला. आयसीसीने या महत्त्वाच्या भूमिकेसाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची निवड केली. विश्वचषकात सचिनच्या नावावर एकापेक्षा एक विक्रम आहेत. आपल्या कारकीर्दीत तब्बल 6 वेळा विश्वचषक खेळणारा सचिन अहमबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या ट्रॉफीसोबत दिसेल.

काय म्हणाला सचिन?
महत्त्वाची भूमिका मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याच्या कारकीर्दीतील अभिमानास्पद क्षणाचाही खुलासा केला. तसेच, त्याने त्यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या. सचिन म्हणाला, “1987मध्ये बॉल बॉय ते 6 हंगामात देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत, विश्वचषकाने नेहमीच माझ्या हृदयात एक विशेष स्थान ठेवले आहे. 2011मध्ये विश्वचषक जिंकणे माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे.”

यानंतर सचिनने आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेविषयी उत्सुकता व्यक्त केली. तो म्हणाला, “भारतात आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023मध्ये इतके सारे खास संघ आणि खेळाडू कट्टर प्रतिस्पर्धा करण्यासाठी तयार असण्यासोबतच, मी या शानदार स्पर्धेसाठी उत्सुक आहे. मला आशा आहे की, हा हंगामही युवा मुली आणि मुलांना खेळात सामील होण्यासाठी आणि उच्च स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रेरित करेल.”

स्पर्धेचा पहिला सामना
गुरुवारपासून (दि. 05 ऑक्टोबर) सुरू होत असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ एकमेकांशी भिडतील. इंग्लंडने 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे हेच संघ आता स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात आमने-सामने असतील.

दुसरीकडे, भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानचा सामना करेल. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भिडेल. भारतात अखेरचा विश्वचषक 2011मध्ये खेळला गेला होता. त्यावेळी भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांचा दुष्काळ संपवत विश्वचषक जिंकला होता. भारताने श्रीलंकेला अंतिम सामन्यात पराभूत केले होते. यावेळीही भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. (big news icc announced sachin tendulkar as global brand ambassador for world cup 2023)

हेही वाचा-
कर्णधाराच्या दीडशतकानंतरही श्रीलंका पराभूत, अफगाणिस्तानने जिंकला सराव सामना
कर्णधार बाबरची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तान पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---