क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आयर्लंड महिला क्रिकेट संघाची मधल्या फळीतील फलंदाज शॉना कवनाघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली आहे. शॉनाने एप्रिल 2011मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने 58 टी20 आणि 27 वनडे सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. निवृत्त झाल्यानंतर तिने मोठे भाष्यही केले आहे.
काय म्हणाली शॉना?
शॉना कवनाघ (Shauna Kavanagh) हिने आपल्या निवृत्तीविषयी प्रतिक्रिया देत म्हटले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबाबत मी मागील काही काळापासून विचार करत होते. आता मला वाटते की, आयर्लंडसोबतचा आपला क्रीडा प्रवास समाप्त करण्याची ही योग्य वेळ आहे. आयर्लंडसाठी बराच काळ क्रिकेट खेळणे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग राहिला आहे. यामध्ये कोणतीच शंका नाहीये की, हे एक भावनात्मक परिवर्तन असेल.”
Shauna Kavanagh brings down the curtain on a wonderful international career.
110 caps to her name, including 27 ODIs and 58 T20Is.Thank you Shauna, for everything. 🏏 ☘️ #BackingGreen #ThankYouShauna pic.twitter.com/asQOVjz7ei
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) August 17, 2023
पुढे बोलताना तिने आयर्लंड क्रिकेटशी संबंधित सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही धन्यवाद दिला. ती म्हणाली की, “माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच फायदेशीर राहिली आहे. मला ज्या सर्व संधी आणि अनुभव मिळाले, त्यासाठी मी अविश्वसनीयरीत्या आभारी आहे. मी क्रिकेट आयर्लंडच्या स्टाफला त्यांच्या सदैव पाठिंब्यासाठी धन्यवाद देऊ इच्छिते. खासकरून त्या सर्व सहाय्यक स्टाफला, ज्यांच्यासोबत मी काम केले आहे.”
शॉनाची कारकीर्द
शॉना कवनाघ हिने एप्रिल 2011मध्ये दोन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात पदार्पण केले होते. तिने 27 वनडे सामन्यात फलंदाजी करताना 206 धावा, तर 58 टी20 सामन्यात 345 धावा केल्या आहेत. तिने अखेरचा सामना सप्टेंबर 2022मध्ये टी20 विश्वचषकाच्या क्वालिफायरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. कवनाघ हिला अलीकडेच नेदरलँडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडले गेले होते. मात्र, तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तिने 2016 आणि 2018च्या टी20 विश्वचषकात आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, ती यावर्षीही संघाचा भाग होती. (Big News ireland women cricketer shauna kavanagh retires from international cricket)
महत्त्वाच्या बातम्या-
कहर! चार वर्षात 2 वनडे खेळलेला अश्विन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात?
मोठी बातमी! हैदराबाद क्रिकेट एसोसिएशनने वाढवंल बीसीसीआयचं टेन्शन, पत्र लिहून मांडली व्यथा