---Advertisement---

लय भारी! भारताला 28 वर्षांनी चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीचा विजयी षटकार होणार ‘अमर’, एमसीएचा मोठा निर्णय

On: मंगळवार, एप्रिल 4, 2023 11:32 AM
MS-Dhoni-Six
---Advertisement---

भारतीय संघाने 28 वर्षांनंतर 2 एप्रिल, 2011 रोजी वनडे विश्वचषक जिंकला होता. यावेळी संघाचे नेतृत्व एमएस धोनी याच्याकडे होते. एमएस धोनीने षटकार मारून भारताला चॅम्पियन बनवले होते. यावर रवी शास्त्री यांनीही जबरदस्त समालोचन केले होते. धोनीचा तो षटकार जागतिक क्रिकेटमध्ये आयकॉनिक क्षणांपैकी एक बनला आहे. आता त्याच ऐतिहासिक षटकाराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन यांनी एमएस धोनीच्या षटकाराचे मेमोरियल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर हा षटकार नेहमीसाठी अमर होणार आहे.

‘जिथे षटकार पडला, तिथे बनणार मेमोरियल’
मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) यांनी निर्णय घेतला आहे की, एमएस धोनीचा षटकार जिथे पडला होता, तिथेच मेमोरियल बनवले जाईल. एमसीएचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. ते म्हणाले की, “आम्ही षटकार जिथे पडला होता, तिथेच मेमोरियल बनवणार आहोत. मात्र, या गोष्टीची माहिती घेणे खूपच कठीण आहे की, वास्तवात कोणत्या सीटवर षटकार पडला होता. मात्र, आम्ही 3-4 सीटची ओळख पटवली आहे आणि तिथेच मेमोरियल बनेल.”

याव्यतिरिक्त महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नायक यांनी सांगितले की, “हे एमएस धोनीच्या मॅचविनिंग खेळीसाठी ट्रिब्युट असेल. आशा आहे की, यामुळे अनेक युवा खेळाडू प्रेरित होतील आणि एमएस धोनीच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील.”

वनडे विश्वचषक 2011चा अंतिम सामना
वनडे विश्वचषक 2011 (ODI World Cup 2011) स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे खेळला गेला होता. या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 274 धावांचा डोंगर उभा केला होता. अंतिम सामन्याच्या मानाने हे खूपच मोठे आव्हान होते. भारतीय संघाने आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीचे विकेट्स लवकर गमावले होते. यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात 109 धावांची भागीदारी झाली होती. या भागीदारीने संपूर्ण सामन्याची दिशा बदलली होती. गंभीरने 97 धावांचे मोलाचे योगदान दिले होते. तसेच, धोनीने नाबाद 91 धावांची खेळी करून संघाला विजयी बनवले होते. जेव्हा भारतीय संघ विजयाच्या जवळ होता आणि 11 चेंडूत 4 धावांची गरज होती, तेव्हा धोनीने नुवान कुलसेकरा याच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत इतिहास घडवला होता. (big news mca will create a memorial of winning six by ms dhoni in 2011 world cup final read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विरोधी संघाचे फलंदाजच चांगले…’, पराभवानंतर राहुलने ‘या’ खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर
धोनीसेनेच्या विजयाने बदलून टाकला पॉइंट्स टेबल, जाणून घ्या कुणाकडे आहे ऑरेंज अन् पर्पल कॅप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---