टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरू होण्यासाठी अद्याप बरेच महिने आहेत. मात्र, त्यापूर्वी क्वालिफायर सामने खेळवले जात आहेत. अशातच टी20 विश्वचषक आफ्रिका रीजन क्वालिफायर 2023मधून मोठी बातमी समोर येत आहे. स्पर्धेतील 15वा सामना मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) नामीबिया विरुद्ध टांझानिया संघात खेळला गेला. हा सामना नामीबिया संघाने 58 धावांनी जिंकला. यासह, नामीबिया टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला.
नामीबिया पहिलाच संघ
वाँडरर्स क्रिकेट स्टेडिअम, विंडहोक (Wanderers Cricket Ground, Windhoek) येथे पार पडलेल्या या सामन्यात टांझानिया (Tanzania) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी नामीबिया (Namibia) संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 विकेट्स गमावत 157 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टांझानिया संघ 20 षटकात 6 विकेट्स गमावत 99 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना नामीबियाने 58 धावांनी खिशात घातला. या विजयासह नामीबिया आफ्रिका टी20 विश्वचषक क्वालिफायरमधून टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी क्वालिफाय होणारा पहिलाच संघ बनला.
Namibia beat Tanzania by 58 runs to confirm their berth at the ICC Men's T20 World Cup 2024 in the West Indies and USA.
CONGRATULATIONS NAMIBIA ???????? pic.twitter.com/Gr5j7wk5sr
— Sameer khan (@irealsameerkhan) November 28, 2023
नामीबियाचा सलग पाचवा विजय
विशेष म्हणजे, टांझानियाविरुद्धचा नामीबियाचा हा सलग पाचवा विजय ठरला. नामीबियाने या स्पर्धेतील पहिला सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्यात त्यांना 7 विकेट्सने विजय मिळवण्यात यश आले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नामीबियाने युगांडाला 6 विकेट्सने नमवले. तिसऱ्या सामन्यात रवांडाला 68 धावांनी पराभवाची धूळ चारली. तसेच, चौथ्या सामन्यात केनियाविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला. अशाप्रकारे नामीबियाने आपला सलग पाचवा विजय मिळवला. आता त्यांना स्पर्धेतील अखेरचा सामना 30 नोव्हेंबर रोजी नायजेरियाविरुद्ध खेळायचा आहे.
तब्बल 19 संघ निश्चित
हा विजय मिळवताच नामीबिया टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी पात्र ठरणारा एकूण 19वा संघ ठरला. अशाप्रकारे आता क्वालिफाय होणारा फक्त एक संघ बाकी आहे. या एका जागेसाठी झिम्बाब्वे, युगांडा आणि केनिया यांच्यामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळेल. (Big News Namibia is the first team to qualify for the T20 World Cup 2024 from the Africa T20 World Cup Qualifiers)
हेही वाचा-
T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला
टी20 मालिकेत सूर्याच्या निशाण्यावर विराटचा महाविक्रम! मोडला तर बनेल ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय