जगभरात अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक म्हणजे स्क्वॉश. सध्या स्क्वॉश विश्वचषक 2023 सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. गुरुवारी (दि. 15 जून) जपानला पराभूत करत भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वलस्थानी राहून उपांत्य सामन्यात आपली जागा पक्की केली आहे. विशेष म्हणजे, स्क्वॉश या खेळाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
साखळी फेरीत कुणाला पराभूत केलं?
स्क्वॉश विश्वचषक 2023 (Squash World Cup 2023) स्पर्धेच्या ब गटात भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. भारताने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये हाँगकाँग, दक्षिण आफ्रिका आणि जपान यांना सहजरीत्या पराभूत केले. भारताने हाँगकाँगविरुद्ध 4-0 ने विजय मिळवत आपल्या अभियानाची सुरुवात केली. यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका संघालाही 4-0 याच अंतराने पराभवाचा धक्का दिला.
भारताकडून जपानचा पराभव
भारतीय संघाला साखळी फेरीतील आपल्या अंतिम सामन्यात जपानचे आव्हान होते. तसेच, भारताला गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावण्यासाठी हा विजय मिळवणे खूपच गरजेचा होता. अशात अभय सिंग जपानचा सर्वोत्तम खेळाडू असलेल्या तोमोटाका याच्या विरुद्ध होता. या सामन्यात त्याने जपानला 1-0ने आघाडी मिळवून देण्यासाठी अभयला सलग तीन गेममध्ये पराभूत केले.
मात्र, जोशना चिनप्पा, सौरव घोषाल आणि तन्वी खन्ना यांनी आपापल्या विरोधकांविरुद्ध विजय मिळवला. तसेच, याची खात्री केली की, उपांत्य फेरीत भारताचा सामना कमी कठीण प्रतिस्पर्ध्याशी होईल.
उपांत्य सामन्यात मलेशियाचे आव्हान
भारतीय संघ पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात पोहोचला आहे. शुक्रवारी (दि. 16 जून) भारत विरुद्ध मलेशिया (India vs Malaysia) संघात स्क्वॉश विश्वचषक 2023 स्पर्धेचा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई येथे सायंकाळी 6 वाजता पार पडणार आहे. भारतीय संघात अभय सिंग, जोशना चिनप्पा, सौरव घोषाल आणि तन्वी खन्ना आहेत. तसेच, भारताकडून पराभूत झालेल्या जपानही अव्वल 2 संघांमध्ये असल्यामुळे त्यांचा सामना मिस्त्रविरुद्ध होणार आहे. (big news squash world cup 2023 team india beat japan to reach semifinal for first time read here)
महत्वाच्या बातम्या-
कोण आहे नभा गड्डमवार, जिच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला CSKचा हुकमी एक्का?
‘तुझ्यामुळे भारत विश्वचषक जिंकत नाहीये’, ट्रोलरने आकाश चोप्राला केले ट्रोल, म्हणाला, ‘मी घेतो जबाबदारी’