क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू चमिका करुणारत्ने याच्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बोर्डाने त्याला एका वर्षासाठी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निलंबित केले आहे. करुणारत्नेवर बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. शिस्तभंगाच्या चौकशीनंतर चमिका करुणारत्नेवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022 दरम्यान करुणारत्नेवर करारातील अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. (big news sri lanka chamika karunaratne handed suspended one year ban from all cricket know here)
बुधवारी (दि. 23 नोव्हेंबर) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) अधिकृतरीत्या निवेदन जारी करत याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, बोर्डाने 26 वर्षीय चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) याला निलंबित करत 5 हजार डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. त्याला बोर्डाच्या कार्यकारी समितीद्वारे त्याच्याविरुद्ध लावण्यात आलेल्या सर्व आरोपांसाठी दोषी ठरवण्यात आले होते. करुणारत्नेने यावर्षीच्या सुरुवातीला श्रीलंका संघाच्या आशिया चषक विजयात मोलाची भूमिका साकारली होती.
Chamika Karunaratne has got 1 year suspended Cricket ban.
The ban will not be implied if there's no further violation of rules from Chamika in the next 12 months.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 23, 2022
कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निवेदनात म्हटले की, “तीन सदस्यीय चौकशी समितीने अलीकडेच संपलेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) दरम्यान खेळाडूंच्या करारातील अनेक कलमांचे त्याने उल्लंघन केले. त्यामुळे चमिका करुणारत्नेची चौकशी केली आहे. तपासात करुणारत्नेवर लावण्यात आलेले सर्व आरोप खरे असल्याचे आढळले.”
आशिया चषकात केले होते शानदार प्रदर्शन
बोर्डाने पुढे म्हटले आहे की, करुणारत्नेने केलेल्या उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी समितीने आपल्या अहवालाद्वारे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कार्यकारी समितीला शिफारस केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पुढील उल्लंघन टाळण्यासाठी खेळाडूला कडक ताकीद देण्यात यावी आणि शिक्षा द्यावी.”
चौकशी समितीच्या शिफारशींनंतर, श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कार्यकारी समितीने चमिका करुणारत्नेला निलंबित केले आणि त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून एक वर्षाची बंदी घातली. श्रीलंका क्रिकेट सध्या या गोष्टीमुळे सर्वत्र चर्चेत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरननंतर आता कोण करणार वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व? ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत
‘त्याची बॅटिंग पाहून मी लगेच फिंचला मेसेज केला आणि म्हटलं…’, सूर्याच्या शतकावर मॅक्सवेलची प्रतिक्रिया