जगभरात वेगवेगळे खेळ खेळले जातात. जसे की, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल, हॉकी आणि बॅडमिंटन. मात्र, आता स्वीडन देशाने जगापुढे एक नवीन खेळ आणला आहे. तो खेळ म्हणजेच सेक्स. जगभरातील अनेक देशात लोक सेक्सबद्दल उघडपणे बोलण्यास कचरतात, पण आता स्वीडन या देशाने सेक्सला खेळात रूपांतरित केले आहे. हे वाचून अनेकांना विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.
स्वीडन हा जगातील असा देश बनला आहे, ज्याने सेक्सला एका खेळाच्या रूपात मान्यता मिळवून दिली आहे. स्वीडन (Sweden) आता पहिल्या यूरोपियन सेक्स चॅम्पियनशिप (European Sex Championship) स्पर्धेचे आयोजन करणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, स्वीडनने नुकतेच सेक्सची खेळाच्या रूपात नोंदणी केली आहे. आता तिथे यूरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन 8 जूनपासून होणार आहे. या स्पर्धेत यूरोपियन देशातील 20 स्पर्धकांनी भाग घेण्यासाठी नोंदणी केली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रेटिक यांच्या मते, सेक्सला खेळाच्या रूपात मान्यता दिल्याने लोकांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याचाही फायदा मिळेल. यामुळे समाजात सेक्सबद्दल लोकांचे विचार बदलतील.
प्रत्येक दिवशी 6 तासांचा खेळ
दर आठवडा चालणाऱ्या सेक्स चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धकांना दर दिवशी 6 तास ही स्पर्धा करावी लागेल. खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंना स्वत:ला तयार करण्यासाठी जवळपास 45 मिनिटांचा वेळ मिळेल. खरं तर, या स्पर्धेबाबत स्पर्धकांमध्ये खूपच उत्साह असल्याचे बोलले जात आहे.
काय आहेत खेळाचे नियम?
यूरोपियन सेक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण 16 प्रकारच्या स्पर्धा असतील. यामध्ये सिडक्शन, ओरल सेक्स, पेनिट्रेशन, मसाज, अपीयरेन्स, मोस्ट ऍक्टिव्ह कपल अशा प्रकारांचा समावेश असेल. तसेच, प्रत्येक खेळात कोण विजेता होणार याचा निर्णयही परीक्षक आणि प्रेक्षकांमधील मतांवरून घेतला जाईल. यामध्ये 30 टक्के मतं परीक्षकांची, तर 70 टक्के मते प्रेक्षकांची असतील. प्रत्येक प्रकारात सहभागी 5 ते 10 गुण मिळवू शकतात. या दोघांच्या आधारावरच विजय आणि पराभव ठरवला जाईल. (big news sweden sex championship start 8 june know all Rules of the game)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मन सुन्न करणारी घटना! ओडिसा रेल्वे भीषण अपघातावर व्यक्त झाला विराट; म्हणाला, ‘खूपच दु:ख…’
‘आमच्या देशात यायला प्रत्येक संघ घाबरतोय’, Asia Cupपूर्वी पाकिस्तानच्याच माजी खेळाडूचे खळबळजनक भाष्य