Dave Houghton Resigns: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक डेव्ह हॉटन यांनी मोठे पाऊल उचलले आहे. डेव्ह हॉटन यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या निर्णयामागे खेळाडूंसोबतच्या खराब नात्याचा हवाला दिला आहे. तसेच, झिम्बाब्वे संघ नामीबिया आणि युगांडा संघाकडून पराभूत होऊन टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याचेही कारण सांगितले आहे.
झिम्बाब्वे (Zimbabwe) संघ टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी क्वालिफाय न केल्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेट संघाने कारणांचा तपास घेण्यासाठी समिती नेमली होती. या तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष लॉयड मिशी होते.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे हॉटन यांना पत्र
झिम्बाब्वे क्रिकेट (Zimbabwe Cricket) बोर्डाने बुधवारी (दि. 20 डिसेंबर) डेव्ह हॉटन (Dave Houghton) यांना एक पत्र लिहिले. त्यात म्हटले गेले की, “हॉटन म्हणाले की, 18 महिन्यांच्या प्रभारीनंतर त्यांनी ‘ड्रेसिंग रूम’ गमावले आहे. तसेच, संघाला पुढे जाण्यासाठी एक नवीन विचाराची गरज आहे.”
Dave Houghton admits he lost the dressing room upon his resignation as Zimbabwe men's head coach 👇https://t.co/xfrv3KaQOm
— ICC (@ICC) December 21, 2023
अध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा
झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी यांनी म्हटले की, “डेव नेहमीच आमच्या खेळाचे दिग्गज राहतील. तसेच, ही खेदजनक बाब आहे की, त्यांना वाटले ड्रेसिंग रूमला आता एका नवीन आवाजाची गरज आहे.”
टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही झिम्बाब्वे संघ
खरं तर, क्वालिफायर फेरीत युगांडा आणि नामीबिया संघाकडून पराभूत झाल्यानंतर झिम्बाब्वे गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिला होता. विशेष म्हणजे, टी20 विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी अव्वल 2 स्थानी राहणे गरजेचे होते. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेत याच झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. (big news zimbabwe head coach dave houghton resigns after team fails to qualify t20 world cup 2024)
हेही वाचा-
IPL लिलावात 20.50 कोटी घेणाऱ्या कमिन्सला घरचा आहेर; दिग्गज म्हणाला, ‘तो तर कसोटी प्लेअर…’
‘जर रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार असता, तर मी…’, सुरेश रैनाचं स्टेटमेंट तुफान व्हायरल